शहरी लसीकरण केंद्रावर आज केवळ कोविशिल्डच लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:49+5:302021-05-31T04:14:49+5:30
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ८ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ.शंकरराव ...

शहरी लसीकरण केंद्रावर आज केवळ कोविशिल्डच लस
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ८ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या ८ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत.
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या १६ केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, हिमायतनगर, कंधार या केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी व उमरी या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे ७० डोस, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कोव्हॅक्सिनचे ५०, ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे कोव्हॅक्सिनचे २० डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.
जिल्ह्यात २९ मेपर्यंत एकूण ४ लाख २५ हजार ५२४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर ३० मेपर्यंत कोविशिल्डचे ४ लाख १३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ११ हजार ८६० डोस, याप्रमाणे एकूण ५ लाख ११ हजार ९९० डोस प्राप्त झाले आहेत.
हे सर्व डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्याच्या १२ ते १४ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर ४५ वर्षांवरील लाभार्थी नसेल, तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सिन ही लस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरिता cowin.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे, तसेच लसीकरणाची वेळ निश्चित झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले.
000000