शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आवासच्या आशेत उघड्यावर राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:20 IST

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र माहूर शहरात स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३४७ नागरिकांना दोन टप्प्यात घरकुल मंजूर करण्यात आले़ यापैकी २५ लाभार्थ्यांना ८० हजार तर ३२ लाभार्थ्यांना फक्त ४० हजारांचे अनुदान मिळाले़ उर्वरित निधीअभावी सर्वांचीच बांधकामे थांबले आहेत़ त्यामुळे भरपावसाळ्यात या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे़

ठळक मुद्देमाहूर तालुक्यातील चित्र अपुऱ्या निधीमुळे पंतप्रधान आवासची कामे रखडली

ईलियास बावानी।श्रीक्षेत्र माहूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र माहूर शहरात स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३४७ नागरिकांना दोन टप्प्यात घरकुल मंजूर करण्यात आले़ यापैकी २५ लाभार्थ्यांना ८० हजार तर ३२ लाभार्थ्यांना फक्त ४० हजारांचे अनुदान मिळाले़ उर्वरित निधीअभावी सर्वांचीच बांधकामे थांबले आहेत़ त्यामुळे भरपावसाळ्यात या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे़माहुरात घरकुल बांधणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते़ यावेळी नगरपालिकेने कराची जोरात वसुली केली़ नागरिकांनीही मालकीच्या जागेवर घरकुल बांधता यावे यासाठी ८०० पेक्षा जास्त अर्ज सादर केले़ तर सरकारी किंवा खासगी जागेवर असलेल्या ५१८ नागरिकांनी नोंदणी केली़ ३४० नागरिकांनी आम्हाला जागा नाही, घर द्या म्हणून अर्ज केले़ अशाप्रकारे १६०० पेक्षा जास्त अर्ज न.प.कडे जमा झाले होते़ पहिल्या टप्प्यात फक्त ८२ लाभार्थ्यांची निवड झाली़ ८२ पैकी ७० लाभार्थ्यांना बांधकाम परवाने देण्यात आले तर त्यापैकी ५७ लाभार्थ्यांनी काम सुरू केले़ त्यांना प्रत्येकी ४० हजार देण्यात आले़ त्यानंतर २५ लाभार्थ्यांना आणखी ४० हजार देण्यात आले़शहरात १६०० पेक्षा जास्त नागरिकांनी घरकुल मिळावे यासाठी अर्ज दाखल केले़ यापैकी फक्त २५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ८० हजार रुपये देण्यात आले़ दुसरीकडे,राज्य सरकारने १ लक्ष रुपयापैकी केवळ ४० हजार दिले असून असून केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये येणे आहे़ घरकुलासाठी ४ टप्प्यात शासनाकडून अर्ज मागविण्यात आले होते़ ६०० हून अधिक जण जागा व घर नसल्याने भाड्याने राहतात़ त्यांच्यासाठी किमान ६ एकर जागा घेऊन ६०० घरे बांधावी लागणार आहे़घरकुल बांधकामाचे कंत्राट अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आले आहे़ या संस्थेकडून नांदेड येथे मराठवाडा समन्वयक म्हणून शेख हिरालाल नांदेड व माहूरचे प्रकल्प समन्वयक म्हणून राजू सोनकांबळे माहूर चे समन्वयक लक्ष्मीकांत कापसे यांची नियुक्ती केली आहे़घरकुलांचे काम किती झाले याचा हिशेब ठेवण्याचे काम नियमानुसार झाले किंवा नाही याची माहिती ठेवण्यासाठी अभियंता म्हणून विशाल ढोरे यांची नेमणूक करण्यात आली असून या सर्व कामांचा आढावा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी घ्यायचा आहे़ याशिवाय लेखाधिकारी वैजनाथ स्वामी यांचीही मोठी जबाबदारी आहे.मंजूर ८२ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे असे एकूण ३२ लक्ष ८० हजार रुपये माहूर नगरपंचायतला देण्यात आले होते़ त्यामुळे पुढील रक्कमही येईल या आशेवर मुख्याधिकारी कदम यांनी ७० लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी दिली़ त्यातील फक्त ५७ लाभार्थ्यांनीच काम सुरु केले़ त्यामुळे त्यांना प्रत्येकी ४० हजार देण्यात आले़ तर २५ लाभार्थ्यांनी काम पूर्ण केले आहे़पहिल्या हप्त्यापोटी आलेली ३२ लाख ८० हजार रुपयांची रक्कम कामे पाहून वाटप करण्यात आली आहेत़ उर्वरीत नागरिकांनी कामे झाल्याने पुढील हप्त्याच्या रकमेची मागणी केली आहे़ त्यानंतर १७ मे रोजी म्हाडाकडे पत्र पाठवून पुढील हप्त्याची मागणी करण्यात आली आहे़या संदर्भात शासनासह म्हाडाकडे घरकुल लाभार्थ्यांच्या पुढील हप्त्यासाठी दोन वेळा पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली आहे़ या संदर्भातला निधी उपलब्ध होताच लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. -मुख्याधिकारी विद्या कदम, माहूर ऩप़

टॅग्स :NandedनांदेडHomeघरSocialसामाजिक