शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

हागणदारी मुक्ती आली अंगावर, ग्रामस्थांनी बीडीओना पाणी प्रश्नावरून अर्धातास डांबले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 19:20 IST

शौचालय बांधकामाची माहिती देण्यास गेलेल्या बीडीओना ग्रामस्थांनी पाणी प्रश्नी अचानक घेरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आक्रमक होत बीडीओंना अर्धातास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले.

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील सावरगाव (माळ) येथे शौचालय बांधकामाची माहिती देण्यासाठी बिडीओ सुभाष धनवे काही अधिका-यांसह आले होते. धनवे यांनी माहिती देण्यास सुरु करताच अचानक ग्रामस्थांनी शौचालय सोडून पाणी प्रश्नावरून घेरले.

नांदेड : शौचालय बांधकामाची माहिती देण्यास गेलेल्या बीडीओना ग्रामस्थांनी पाणी प्रश्नी अचानक घेरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आक्रमक होत बीडीओंना अर्धातास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले. हदगाव तालुक्यातील सावरगाव (माळ) येथील या घटनेने हागणदारी मुक्तीचे 'टार्गेट' पूर्ण करण्यास गेलेल्या बीडीओची चांगलीच पंचायत झाली. 

हदगाव तालुक्यातील सावरगाव (माळ) येथे शौचालय बांधकामाची माहिती देण्यासाठी बिडीओ सुभाष धनवे काही अधिका-यांसह आज सकाळी आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमले होते. धनवे यांनी माहिती देण्यास सुरु करताच अचानक ग्रामस्थांनी शौचालय सोडून पाणी प्रश्नावरून घेरले. आधी पिण्याचे पाणी द्या मग शौचालयावर बोला असा पवित्रा घेत त्यांनी धनवे यांना निरुत्तर केले. त्यांच्या हातातले माईक हिसकावत त्यांना ग्रामपंचायत कार्यालतात डांबून ठेवले. यावेळी त्यांच्या सोबत आलेले स्वच्छता दूत माधव पाटील यांनी स्वतःची सुटका करत गावातून पळ काढला. अर्ध्यातासानंतर ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी संतप्त ग्रामस्थ कार्यालयातून जाताच त्यांची सुटका केली. 

काय आहे ग्रामस्थांचे म्हणणे या गावाची लोकसंख्या पाच हजार आहे. गावातील पाणी फ्लोराइड युक्त असल्याने पिण्यासाठी येथे शुध्द पाणी नाही. दीड कोटीची पाणी पुरवठा योजना झाली तरीही गावातील नळाला पाणी आले नाही.यामुळे ग्रामपंचायतने आरओ मशिन बसवून  एका कुटुंबाला ५ रुपयामध्ये 20 लिटर पाण्याचा कोटा दिला आहे. यातच भारनियमन वाढल्याने पाणी शुद्ध होण्यास वेळ लागत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. यामुळे एकीकडे पिण्याचे पाणी नाही आणि अधिकारी शौचालय बांधण्यासाठी दबाव आणतात या समाजातून ग्रामस्थांनी आक्रमक होत हे पाउल उचले. 

ग्रामस्थ प्रतिसाद देत नाहीतझालेल्या प्रकारावर बोलताना बीडीओ धनवे म्हणाले, एकीकडे शौचालय बांधकाम करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दबाव आणतात तर दुसरीकडे ग्रामस्थ प्रतिसाद देत नाहीत.