ई पॉस वर अंगठा, नांदेडात वाढणार कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:53+5:302021-05-01T04:16:53+5:30
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेक गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मोफत स्वस्त धान्य वाटप करण्याचा ...

ई पॉस वर अंगठा, नांदेडात वाढणार कोरोनाचा धोका
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेक गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मोफत स्वस्त धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता रेशन दुकानदारांना ई पॉस मशीनवर अंगठा लावणे आवश्यक करण्यात येणार असल्याने कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
चौकट- रेशन दुकानदारांकडे सॅनिटायझर राहणार का
शासनाच्या निर्णयानुसार १ मेपासून मोफत स्वस्त धान्य वाटप केले जाणार आहे. परंतु लाभार्थ्यांना ई पॉसवर अंगठा लावावा लागणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. काही रेशनदुकानदार सॅनिटायझर ठेवतील. परंतु सर्वच रेशन दुकानदारांकडे सॅनिटायझर राहील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दुकानदारांनी आम्हाला सॅनिटायझर ठेवणे परवडत नसल्याचे सांगितले.
चौकट- रेशन दुकानदारांच्या मागण्या
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेशन दुकानदारांनीही स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. त्यामुळे आम्हाला शासनाने सुरक्षेचे विमा कवच द्यावे, अशी मागणी होत आहे. मोफत धान्य वाटप करताना या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच धान्य वाटपामागे अनुदान देण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून होत आहे.
चौकट-
शासनाकडून अद्याप तशा सूचना नाहीत
शासनाने लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याच्या सूचना १ मेपासून दिल्या असल्या तरी ई पॉसवर लाभार्थ्यांचा अंगठा घेतला जावा, याबाबत कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. मात्र, आज रात्रीपर्यंत याबाबत निर्णय घेऊन कळविले जाईल.
- पठाण लतीफ, जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड