शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करास तीन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:47 IST

तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे रेती तस्करांत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे५० हजार रूपये दंड : बेलूर येथून विनापरवाना रेतीची वाहतूक

धर्माबाद : तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे रेती तस्करांत खळबळ उडाली आहे.धर्माबाद तालुक्यातील बेलूर गावाहून येथील महाराष्ट्र बसस्थानकाकडे विकास साहेबराव किलबिले हा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच - २६ व्ही - ७६०९) मध्ये चार ब्रास रेती १२ मे २००५ रोजी घेऊन जात असताना मध्यरात्री तात्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवून कागदपत्रांची तपासणी केली असता सदरील वाळू चोरट्या मार्गाने विनापरवाना नेत असल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांत तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास साहेबराव किलबिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील प्रकरणाचा तपास जमादार जनार्दन बोधने यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरील प्रकरणात न्यायालयात चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील ए. ए. शिखरे यांनी साक्षी व सबळ पुराव्यासह आपली बाजू भक्कमपणे मांडली. पोलीस नाईक भगवान श्रीरामे यांनी मदत केली. यावरून न्यायाधीश गजभिये यांनी विकास किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिक कारावासाची शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास अधिकचा कारावासतालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टर मध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाल्यामुळे येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणाचा तपास जमादार जनार्दन बोधने यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरील प्रकरणात न्यायालयात चार साक्षीदार तपासण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारी