शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीतील तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:52 IST

मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील सुमारे ५० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुकानाचा पत्रा कापून आतमधील माल लंपास केला जात होता़ या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे़ टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून या चोरट्यांनी जिल्ह्यातील सुमारे ५० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे़नांदेड शहर व मुदखेड येथील मुख्य बाजारपेठेतील दुकानाच्या वरील टीन पत्रे काढून दुकानातील माल लंपास करण्याच्या घटना मागील सात ते आठ महिन्यांत मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या़ या चोरट्यांनी अशा पद्धतीने बाजारपेठेत हैैदोस मांडल्याने व्यापाऱ्यांसह पोलिसांसमोरही या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे टाकले होते़ या चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी़डी़ भारती यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते़ २४ आॅक्टोबर रोजी हे पथक एका प्रकरणाच्या चौकशीसाठी लातूर येथे गेले असता नांदेड जिल्ह्यात होणाºया दुकानफोडीतील आरोपीबाबतची माहिती पथकाला मिळाली़ निजामाबाद येथील श्रीनिवास उर्फ सिनू हा त्याचा साथीदार शेख फारूख याच्यासह सध्या लातूरमध्ये राहत असून त्याच्याच टोळीने नांदेड शहर तसेच मुदखेडमध्ये चोºया केल्याचे समजले़ या माहितीवरून लातूर अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेसमोरून चौक क्रमांक ५ परिसरात पोलिसांनी सापळा रचून तेथे थांबलेल्या श्रीनिवास उर्फ सिनू राजेश्वर करपे (वय २२, रा़निजामाबाद, हल्ली मु़ आबादी, पाठ गल्ली उमरी), सय्यद यासीन सय्यद याकुब (वय ३१, रा़जयनगर, हनुमान मंदिर समोर, लातूर) आणि शेख फारूख शेख मोहम्मद उर्फ सलीम (वय २१, रा़चोंडेश्वर, ता़लातूर) या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघांना पोलिस खाक्या दाखवून चौकशी केली असता त्यांनी मागील सात ते आठ महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील मुदखेडसह इतवारा, वजिराबाद भागात सुमारे पन्नासावर दुकानांचे टीनपत्रे कापून दुकानात प्रवेश केल्याचे आणि दुकानातील ऐवज लांबविल्याची कबुली दिली़ दरम्यान, या आरोपींकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून आरोपीविरोधात तेलंगणातही घरफोडीचे गुन्हे दाखल असून श्रीनिवास उर्फ सिनू करपे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून पुढे आले आहे़या आरोपींना मुदखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी