अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST2021-06-19T04:13:21+5:302021-06-19T04:13:21+5:30

मारतळा, ता. लोहा, जि. नांदेड येथील रहिवासी तथा मजूर लंकेश साहेबराव गवाले (२१), सतीश रामचंद्र देवकांबळे (१९, रा. गऊळ, ...

Three friends killed in unidentified vehicle crash | अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे मित्र ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे मित्र ठार

मारतळा, ता. लोहा, जि. नांदेड येथील रहिवासी तथा मजूर लंकेश साहेबराव गवाले (२१), सतीश रामचंद्र देवकांबळे (१९, रा. गऊळ, ता. कंधार) व विनोद अनिल दर्शने (१८, रा. मारतळा, ता.लोहा) हे तीन तरुण १७ जून रोजी सायंकाळी मारतळा येथून ड्रेस शिवायला टाकण्यासाठी नांदेड शहराजवळील वाजेगाव येथे आले होते. दरम्यान, उपरोक्त तिघेजण गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजेचेदरम्यान (एमएच-२६, बीटी-९८७५) दुचाकीवर वाजेगावकडून मारतळा येथे परत जात होते. त्याचवेळी, नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील धनेगाव बायपास चौकाजवळील रस्त्यावर अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पो.उप.नि. विठ्ठल दुरपडे, पो.उपनि. गणेश होळकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी उपचारार्थ विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, डीवायएसपी. डॉ. सिद्धेश्वर भोरे, प्रभारी पो.नि. अशोक घोरबांड, पो.उपनि. गणेश होळकर व गुन्हे शोध पथकातील पो.उपनि. शेख असद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याप्रकरणी मयत लंकेश गवाले यांचे भाऊ संतोष साहेबराव गवाले यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

(फोटो क्रमांक - १८एनपीएच जेयुएन ०२,०३,०४,०५ जेपीजी)

Web Title: Three friends killed in unidentified vehicle crash