सव्वा लाखांच्या तीन म्हशी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST2021-02-23T04:27:23+5:302021-02-23T04:27:23+5:30
अखंड शिवनाम सप्ताह रद्द कामठा बु. : अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथे आयोजित अखंड शिवनाम सप्ताहमधील सर्व कार्यक्रम रद्द ...

सव्वा लाखांच्या तीन म्हशी लंपास
अखंड शिवनाम सप्ताह रद्द
कामठा बु. : अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथे आयोजित अखंड शिवनाम सप्ताहमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. गावातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. सप्ताहमध्ये शिवपाठ, शिवपाठ पारायण, प्रवचन, गाथा भजन आदी कार्यक्रम होणार होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच मोतीराम भद्रे, रणजीतसिंघ कामठेकर, सतीश व्यवहारे, प्रकाश कोळेवार यांचाही अन्नदानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
प्रकाश सुर्वे यांची तालुकाध्यक्षपदी फेरनिवड
किनवट : मराठा सेवा संघाच्या किनवट तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रकाश सुर्वे यांची, तर सचिवपदी राजीव शिंदे यांची फेरनिवड झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, उद्धवराव सूर्यवंशी, पी.के. कदम, रमेश पवार, डॉ.सतीश जाधव आदी उपस्थित होते. या निवडीचे सुरेश पाटील, प्रा.रमाकांत इंगोले, डॉ.पंजाबराव गावंडे, नेताजी इंगोले आदींनी स्वागत केले.
सोनखेड येथे फिरते लोकअदालत
लोहा : सोनखेड येथील ग्रामपंचायतमध्ये फिरते लोकअदालत हा कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच अच्युत मोरे यांनी याकामी पुढाकार घेतला. यावेळी कमल वडगावकर यांची उपस्थिती होती. तसेच बीडीओ प्रकाश जोंधळे, सरपंच अच्युत मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी नांदेडे यांनी केले. कार्यक्रमास लोहा न्यायालयातील कर्मचारी, वकील मंडळी आदी उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताह
भोकर : तालुक्यातील सायाळ येथे २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भागवत कथा, कीर्तन होणार आहे. कथेचे प्रवक्ते गजानन महाराज जुनगडे राहाणार आहेत. यानिमित्ताने मान्यवरांची कीर्तने, भजने होतील.
बंजारा समाजाचे तहसीलदारांना निवेदन
माहूर : माजी वनमंत्री संजय राठोड यांची नाहक बदनामी केल्याच्या निषेधार्थ बंजारा समाजाच्या तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना लखमापूर, जग्गूनाईक तांडा येथील नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी संतोष राठोड, विशाल पवार, दत्ता राठोड, संजय जाधव, रमेश राठोड, विजय राठोड, अरविंद पवार, माजी सरपंच भुरड आदी उपस्थित होते.
भाजपचे आंदोलन स्थगित
नांदेड : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भाजपने नियोजित जेलभरो आंदोलन स्थगित केले आहे. दि. २४ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाणार होते. मात्र कोरोनामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
जिल्हा परिषद स्थायीची आज सभा
नांदेड : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा उद्या, दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीत विविध निर्णय होणार आहेत.