जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:12+5:302021-03-26T04:18:12+5:30

नांदेड- कंधार तालुक्यातील मौजे लिंबा तांडा येथे दिलेले ट्रॅक्टर परत मागितल्याने एका शेतकर्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना ...

Three bikes were stolen in the district | जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

नांदेड- कंधार तालुक्यातील मौजे लिंबा तांडा येथे दिलेले ट्रॅक्टर परत मागितल्याने एका शेतकर्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २४ मार्च रोजी घडली. सुर्यकांत सखाराम राठोड असे जखमी शेतक-याचे नाव आहे. त्यांना चार जणांनी मारहाण केली. या प्रकरणात कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ट्रक चालकाला पैशासाठी मारहाण

ट्रक विक्रीच्या व्यवहाराचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सिडको भागात घडली. पोशेट्टी बाशेट्टीवार असे जखमीचे नाव आहे. २३ मार्च रोजी ते ट्रक विक्रीचे पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले होते. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पैशाच्या मागणीसाठी दोन विवाहितांचा छळ

माहेराहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी दोन विवाहितांचा छळ करण्यात आला. पहिली घटना मुखेड येथे घडली. या ठिकाणी पिडीतेला माहेराहून दोन लाख रुपये घेवून येण्यासाठी त्रास देण्यात आला. या प्रकरणात मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर शहरातील गोकुळनगर येथे दोन लाख रुपये न आणल्यामुळे पिडीतेचा गर्भपात करुन घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

दारु घेवून जाणारी इंडीका पकडली

भोकर येथे एका लॉजसमोरुन दारु घेवून जाणारी इंडीका कार पोलिसांनी पकडली. ही कारवाई २३ मार्च रोजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एक लाख रुपयांची कार पाच हजार रुपयांची दारु जप्त केली. या प्रकरणात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Three bikes were stolen in the district