तीन जनावरे नेली पळवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST2021-04-23T04:19:22+5:302021-04-23T04:19:22+5:30
घरगुती कारणावरून एकास मारहाण नांदेड : शहरातील नल्लागुट्टा चाळ येथील एका व्यक्तीने ‘तू माझ्या बहिणीस का नांदवत नाहीस’ म्हणत ...

तीन जनावरे नेली पळवून
घरगुती कारणावरून एकास मारहाण
नांदेड : शहरातील नल्लागुट्टा चाळ येथील एका व्यक्तीने ‘तू माझ्या बहिणीस का नांदवत नाहीस’ म्हणत शिवीगाळ करत फायटरने मारहाण केली. त्यामध्ये दात पडून दुखापत झाली. मारहाणीनंतर जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी नसीरखॉ चांदखाँ (वय २४) यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गौर हे करत आहेत.
पैशासाठी विवाहितेचा छळ
नांदेड : वेल्डिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून पत्नीला उपाशी ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना नांदेड तालुक्यातील वाजेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी २६ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस चंचलवाड हे करत आहेत.
जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा
नांदेड- हदगाव तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा कोहळी येथे जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून १४५० रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले तसेच नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे सोमठाणा ते कोलंबीकडे जाणाऱ्या पुलाजवळ तिर्रट जुगार खेळताना छापा टाकून १४ हजार २०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.