शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:30 AM

तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

शेख इलियास ।बिलोली : तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.बिलोली तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन, उडीद, तूर पिकाची शेती केली जाते़ मात्र उत्पादन खर्च अधिक, उत्पन्न कमी या प्रकारामुळे सोयाबीन, उडीद, तूर पिकामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बडूर येथील तरुण शेतकरी श्रीनिवास जाधव यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले़ बालपणापासूनच श्रीनिवास जाधव यांना शेतीची आवड होती.वडिलोपार्जित शेतजमिनीत स्वत:च्या कल्पनेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र यावर्षी त्यांनी ३ एकर शेतीत हळदीची लागवड केली होती. त्यांना ठिबक, खत काढणी, जैविक फवारणी याकरिता ९० हजार रुपये खर्च आला तर उत्पन्न पाचपट झाले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या अवकृपेने दगा दिला असला तरी ३ एकरांत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले़ या उत्पन्नातून त्यांना २० लाख रुपये नफा मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.आजची तरुणाई तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत असतानाच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेतीवरील जीवापाड प्रेम इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे. तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, कापूस पीक घेणाºया शेतकऱ्यांनी श्रीनिवास जाधव यांचा आदर्श घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्वत्र शेतकरी दुष्काळीस्थितीत अडकल्याने आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतो. परंतु, हीच शेती पारंपरिक पद्धतीने केल्यास अशा परिस्थितीचा सामना करता येतो. मला बालपणापासूनच शेतीची आवड होती. मी तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील 'टर्मरिक मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तज्ज्ञांकडून या हळदीचे बेणे आणले आहे. आदर्श शेती ही नियोजनातून निर्माण करता येते.-श्रीनिवास जाधव, शेतकरी बडूर

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती