शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

तीन आरोपी अटकेत, इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:43 IST

नगर परिषदेत अग्निशमन दलाच्या नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली. याप्रकरणात १५ आरोपी असून, न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

ठळक मुद्देभोकर पालिकेतील नोकर भरती घोटाळा : न्यायालयाच्या आदेशानुसार १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : नगर परिषदेत अग्निशमन दलाच्या नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली. याप्रकरणात १५ आरोपी असून, न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.गुन्हा नोंद झालेल सर्व आरोपींना अटकेच्या मागणीसाठी तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह २ आॅक्टोबर गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.येथील नगर परिषदेत सन २०१५ मध्ये अग्निशमन दलात झालेल्या नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, तत्कालीन नगर अभियंता (विद्युत) गजानन सावरगाकर, तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता श्रीहरी चोंडेकर, तत्कालीन लेखापाल रामसिंग लोध यांच्यासह १५ आरोपींविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी भोकर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून यातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. याबाबत तक्रारदार नगरसेविका अरुणा देशमुख यांनी वेळोवेळी संबंधितांना निवेदन देवूनही आरोपी मुक्तपणे वावरत आहेत. यास पोलीस प्रशासनास जबाबदार धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शिवसेना कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारपासून तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करुन आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या आशयाचे निवेदन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना दिले. आंदोलनात रा.काँ. तालुकाध्यक्ष सुभाष घंटलवार, नगरसेवक तौफिक ईनामदार, शेख वकील, शिवाजी पाटील किन्हाळकर, डॉ. फेरोज इनामदार, उत्तम बाबळे, जवाजोद्दीन बरबडेकर, मोहण पाटील हस्सापूरकर, चंद्रकलाबाई गायकवाड, राजेश देशमुख, सेनेचे माधव वडगावकर, सुभाष नाईक यांच्यासह तालूक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते. आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.सदर गुन्ह्यातील १५ आरोपी मधील त्रिरत्न कावळे, महेश दरबस्तवार, दिलीप देवतुळे या तीन आरोपींना भोकर पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केली आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी