देगलूर आगाराचे तेरा कर्मचारी कोरोना संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:34+5:302020-12-30T04:23:34+5:30

मुंबईतील बेस्ट परिवहनच्या मदतीसाठी मागील दीड महिन्यापासून दहा चालक व दहा वाहक असे वीस कर्मचारी दहा दिवसासाठी पाठविण्यात आले. ...

Thirteen employees of Deglaur depot infected with corona | देगलूर आगाराचे तेरा कर्मचारी कोरोना संक्रमित

देगलूर आगाराचे तेरा कर्मचारी कोरोना संक्रमित

मुंबईतील बेस्ट परिवहनच्या मदतीसाठी मागील दीड महिन्यापासून दहा चालक व दहा वाहक असे वीस कर्मचारी दहा दिवसासाठी पाठविण्यात आले. या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात येऊन त्यांना दररोज जेवणाचा भत्ता देण्यात आला. आतापर्यंत ऐंशी कर्मचारी तेथे सेवा देऊन परतले आहेत. यापैकी तेरा जण कोरोना संक्रमित झाले. रविवारी आणखी वीस कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कोरोना संक्रमित तेरा कर्मचाऱ्यांपैकी तीन होम आयसोलेशनमध्ये तर उर्वरित दहा येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा

शंकरनगर : परिसरात दत्तजयंती उत्सव दत्त मंदिरात पूजापाठ व महाप्रसादाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किनाळा व रामतीर्थ ता. बिलोली येथील दत्त मंदिरात २९ डिसेंबर रोजी सकाळी महापूजा दिवसभर भजन व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Thirteen employees of Deglaur depot infected with corona