शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चोरट्यांनी लुबाडले अन् पोलिसांनी ठाणे हद्दीवरून छळले; हतबल पित्याचे पोलीस अधीक्षकांकडे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:28 IST

आधीच चोरीने हैराण झालेल्या बाप-लेकीचा पोलिसांनीही छळ मांडला

ठळक मुद्देलेकीला घेऊन माहेरी जाताना बसमध्ये २ तोळ्याचे दागिने चोरीस गेले नांदेड ग्रामीण पोलिसांनी जेथून बसले तेथे जाण्यास सांगितलेतर कुंटूर ठाण्यात जिथे घटना कळली तिथे जाण्यास सांगितले

नांदेड : परभणी जिल्ह्याती मानवत येथील माहेरी आपल्या पित्यासोबत जात असताना बसमध्ये एका विवाहितेचे दोन तोळ्याचे दागिने लंपास करण्यात आले. परंतु याबाबत तक्रार घेण्यास नांदेड ग्रामीण आणि कुंटूर पोलीस ठाण्यांनी हद्दीचे कारण सांगत नकार दिला. त्यामुळे शेवटी पित्याने पोलीस अधीक्षकांकडेच आपले गाऱ्हाणे मांडले. घडलेल्या घटनेमुळे हैराण झालेल्या बाप-लेकीचा पोलिसांनीही असा छळ मांडला होता.

विलास उद्धवराव पाटील रा.मानवत हे मुलीला नेण्यासाठी नायगांव तालुक्यातील कोलंबी येथे गेले होते. मुलीला घेऊन त्यांनी कहाळा ते नांदेड बसमध्ये प्रवास केला. नांदेड बसस्थानकावर आल्यानंतर त्यांना आपल्या जवळील दोन तोळ्याचे दागिने लंपास झाल्याचे समजले. यावेळी त्यांना संशयित चोरटे हे एमआयडीसी भागात उतरले असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी नांदेड ग्रामीण ठाणे गाठले. 

परंतु या ठिकाणी त्यांना तुम्ही जिथून बसमध्ये बसले तिथे जा असे सांगितले. त्यानंतर पाटील हे कुंटूर ठाण्यात गेले. तिथे त्यांना तुम्हाला जिथे घटना कळाली त्या ठाण्याला जा असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे हैराण झालेल्या पाटील यांनी शेवटी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन  आपले गाऱ्हाणे  मांडले. तसेच चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देण्याची विनंती केली. दरम्यान, शहरात असलेल्या पाचही पोलीस ठाण्यात हद्दीवरुन अशाचप्रकारे तक्रारदाराची टोलवाटोलवी करण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे होत असल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस