शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अपहरण करुन लुटणाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:29 IST

मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी चाकूचा दाखवून लुबाडणे, अपहरण करणे यासारखे गुन्हे करणा-या तिघांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले आहे़ आरोपींनी मरळक शिवारात एका कार- चालकाचे अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी चाकूचा दाखवून लुबाडणे, अपहरण करणे यासारखे गुन्हे करणा-या तिघांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले आहे़ आरोपींनी मरळक शिवारात एका कार- चालकाचे अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली़७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नांदेडहून वसमतकडे जाणारी कार मरळक शिवारात तिघांनी अडविली़ यावेळी कारचालकाला चाकूचा धाक दाखवून कारसह त्यांचे अपहरण केले़ कारचालकाला अपहरणकर्ते भाग्यनगर हद्दीत एका एटीएमवर घेवून गेले़ या ठिकाणी कारचालकाच्या एटीएममधील रक्कम काढून त्यांनी पोबारा केला़ या प्रकरणी कारचालकाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के, पोनि़चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चित्तरंजन ढेमकेवाड, सुभाष आलोने, सचिन गायकवाड, वैजनाथ पाटील यांच्याकडे सोपविला होता़ पोउपनि ढेमकेवाड हे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना खबºयाकडून त्यांना या चोरट्याबाबत माहिती मिळाली़ पोलिसांनी मोबाईलचे दुकान असलेला शेख रफीक शेख अल्लाबक्ष रा़ कामठा, बॅन्ड पथकातील बबलू सोपान गायकवाड रा़वसंतानगर, शेख इम्रान शेख उस्मान रा़इस्लामपुरा या तिघांना ताब्यात घेतले़ पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ तपास पोउपनि जी़एग़ोटके, बालाजी सातपुते हे करीत आहेत़गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळशहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याच्या घटना रोजच घडतात, परंतु यामध्ये बोटावर मोजण्याएवढ्या प्रकरणांतच गुन्हे दाखल केले जातात़ रात्रीच्या वेळी नांदेड ग्रामीण, भाग्यनगर, विमानतळ या हद्दीत मोठ्या प्रमाणात एकटे गाठून लुबाडल्याच्या घटना घडतात़ परंतु पोलिसांकडून ही प्रकरणे दाखलच करुन घेतली जात नाहीत असा अनुभव आहे़ त्यामुळे अशा आरोपींची हिंमत वाढते़ गुन्हा दाखल नसल्यामुळे तपासही केला जात नाही़ त्यामुळे हे आरोपी रेकॉर्डवर न आल्यामुळे सराईत होतात़

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक