श्रीनगर ते शेतकरी चौक रस्ता होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:17 IST2021-02-15T04:17:16+5:302021-02-15T04:17:16+5:30

शहरात हबीब टॉकीज ते राज कॉर्नर हा एकमेव मुख्य मार्ग आहे. याच मार्गावरून शहरातील संपूर्ण वाहतूक सुरू असते. हीच ...

There will be a road from Srinagar to Shetkari Chowk | श्रीनगर ते शेतकरी चौक रस्ता होणार

श्रीनगर ते शेतकरी चौक रस्ता होणार

शहरात हबीब टॉकीज ते राज कॉर्नर हा एकमेव मुख्य मार्ग आहे. याच मार्गावरून शहरातील संपूर्ण वाहतूक सुरू असते. हीच बाब लक्षात घेऊन अंतर्गत रस्ते मोठे करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यात श्रीनगर येथील पंचशील ड्रेसेस ते शेतकरी चौक, तरोडा हा रस्ता रुंद करण्यासाठी महापालिकेने दलित वस्तीतून निधी उपलब्ध करून दिला. जवळपास ४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करून हा रस्ता ४० फुटांचा होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ७५ ते ८० मालमत्ता बाधित होत आहे. मालमत्ता संपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.

Web Title: There will be a road from Srinagar to Shetkari Chowk