कंधारात साडेतीन हजार घरांना मुहूर्त लागेना
By Admin | Updated: May 14, 2014 01:10 IST2014-05-14T00:12:58+5:302014-05-14T01:10:58+5:30
दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना घरकुल देण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी योजना राबविली़ परंतु गत काही वर्षांपासून गरिबांना अद्याप घराचा मुहूर्त लागला नाही़

कंधारात साडेतीन हजार घरांना मुहूर्त लागेना
डॉ. गंगाधर तोगरे, कंधार दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना घरकुल देण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी योजना राबविली़ परंतु गत काही वर्षांपासून गरिबांना अद्याप घराचा मुहूर्त लागला नाही़ खुल्या प्रवर्गातील २२१७ व अनु़जाती प्रवर्गातील १३७८ असे ३ हजार ५९५ लाभार्थी हे घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांचा जीव कासावीस होत आहे़ सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करून अंमलबजावणी करते़ परंतु योजनांची अंमलबजाणी करताना निधीची उपलब्धता असावी लागते़ याची प्रचिती अनेक योजनेच्या रूपातून दिसते़ निधीची तरतूद टप्प्याटप्प्याने होत असल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो़ घरकुल योजनेतील प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची अवस्था मोठी विचित्र झाली आहे़ २००२-२००७ च्या सर्वेक्षणानुसार दारिद्र्य रेषेखालील बेघर कुटुंबांना वाटपासाठी तयार करण्यात आलेल्या रमाई सुधारित प्रतीक्षा यादीतील अनु़जातीचे १ हजार ३७८ लाभार्थी शिल्लक असल्याचे समोर आले आहे़ त्यात मादाळी, गुट्टेवाडी, बिजेवाडी, दिग्रस बु़ या ग्रामपंचायतीअंतर्गत प्रत्येक एक, पेठवडज, जाकापूर, खुड्याचीवाडी व कोटबाजार येथील प्रत्येकी दोन, जंगमवाडी, गुंडा-बिंडा-दिंडा, लाडका व सोमठाणा प्रत्येकी ३, नारनाळी, तेलूर, बोळका, नंदनशिवणी, नावंद्याचीवाडी प्रत्येकी ४, चौकीमहाकाया व चौकी धर्मापुरी प्रत्येकी ५, बोरी खु़, शिराढोण व गोगदरी प्रत्येकी ६, पानभोसी, धानोराकौठा, हरबळ (पक़ं़) प्रत्येकी ७, मोहिजा (पं़), खंडगाव (ह़), तेलंगवाडी प्रत्येकी ८, कारतळा, औराळ, धर्मापुरी (म़), हासूळ, वरवंट प्रत्येकी ९, पोखर्णी व बाबूळगाव प्रत्येकी ११, येलूर, राऊतखेडा प्रत्येकी १२, बहाद्दरपुरा, बामणी (पक़ं़), सावरगाव, नंदनवन, दैठणा, हिप्परगा (शहा), प्रत्येकी १४, शिरूर व सावळेश्वर प्रत्येकी १५,शिर्सी (खु़), आलेगाव, दाताळा, चिंचोली (पक़़) प्रत्येकी १६, चिखली व उस्माननगर प्रत्येकी १७, लाठ (खु़) व उमरज प्रत्येकी १८, कंधारेवाडी, मानसपुरी, मसलगा प्रत्येकी १९, आंबुलगा व शिर्सी बु़ प्रतयेकी २०, बोरी बु़ २१, घोडज व पानशेवडी प्रत्येकी २३, रहाटी व हाडोळी (ब्ऱ) प्रत्येकी २४, कळका व वहाद प्रत्येकी २५, हटक्याळ २७, शेकापूर २८, गोणार २८, गुंटूर २९, कल्हाळी २९, गऊळ ३५, मंगनाळी ३६, बारूळ ४०, कुरूळा ४१, बाचोटी ४७, मंगलसांगवी ४८, काटकळंबा ६५, दिग्रस (खु़) ६८, कौठा ७० व रूई ग्रामपंचायतीअंतर्गत ८४ लाभार्थींचा समावेश आहे़ रमाई योजनेतील शिल्लक लाभार्थी इंदिरा आवासमध्ये समाविष्ट केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पूर्वीच प्रस्ताव सादर झालेला आहे़ पुन्हा औपचारिकरित्या पाठविण्यात येत असल्याचे समजते़ केंद्र व राज्य शासनाचे मिळून ९५ हजार आणि लाभार्थीवाटा ५ हजार अशी १ लाखाची योजना ग्रामीणला आहे़ इंदिरा आवास योजनेत प्रतीक्षा इंदिरा आवास योजनेतील प्रतीक्षा यादीतील (खुला प्रवर्ग) तब्बल २ हजार २१७ लाभार्थी शिल्लक आहेत त्यात शेकापूर ग्रामपंचायतीअंतर्गत २६, शिरूर २७, वंजारवाडी २९, पानशेवडी ३१, मानसिंगवाडी ३१, देवयाचीवाडी ३१, पाताळगंगा-३१, घोडज-३२, उमरगा(खो)-३२, महालिंगी-३३, पांगरा-३३, गोणार-३३, बोरी (खु़)-३३, दिग्रस(खु़)-३६, मसलगा-३६, नंदनशिवणी-३७, वरवंट-३८, बारूळ-३८, गांधीनगर-३८, उमरज-३८, मरशिवणी-३९, बिजेवाडी-४३, शेल्लाळी-४३, फुलवळ-५३, रामानाईकतांडा-४४,बामणी(पक़ं़)-४६, घागरदरा-४८, चिखलभोसी-४९, पानभोसी-५६, आंबुलगा-६२, तळ्याचीवाडी-६३, दिग्रस बु़-६७, बहाद्दरपुरा-७१, लाडका-७३, दहिकळंबा-७६, नागलगाव-१०३, उस्माननगर-१४०, पेठवडज-१४३, हाळदा-१६२ शिराढोण-१७४ अशा ४० ग्रा.पं.तील लाभार्थ्यांचा समावेश आहे़