स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठीची प्रतीक्षा संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:31+5:302021-04-09T04:18:31+5:30
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यात लाॅकडाऊन घेवूनही फारसा फरक पडला नाही. पूर्वीप्रमाणे मृत्यूची संख्याही कायम आहे. त्यात ...

स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठीची प्रतीक्षा संपेना
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यात लाॅकडाऊन घेवूनही फारसा फरक पडला नाही. पूर्वीप्रमाणे मृत्यूची संख्याही कायम आहे. त्यात काही रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून केला जात आहे. मृत्यू झाल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिया पूर्ण करून महापालिकेकडूनच गोवर्धन घाट येथील स्मशानभूमित अंत्यंसंस्कार केले जात आहेत. त्यात नैसर्गिकरित्या मृत पावलेल्यांचेही अंत्यसंस्कार याच ठिकाणी केले जात आहेत. परंतु, काही दिवसात नैसर्गिक मृत पावलेल्या व्यक्तींवर इतर स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिणामी उपलब्ध १८ पिंजरे व मोकळ्या जागेत कोरोना मृतांवरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
महापालिका जन्ममृत्यू नोंद विभागतही नागरिक नोंदणीसाठी गर्दी करत आहेत. त्यात जन्माची नोंद देण्यासाठी येणारे कमी आणि मृत नातेवाईकांची नोंदणी करण्यासाठी गर्दी होत आहे.
नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर लोक अनेक वर्ष मृत्यूची नोंद करत नव्हते. जर काही वारसा, प्राॅपर्टी प्रकरण असेल तरच ज्येष्ठांच्या मृत्यूची नोंद केली जात होती.
कोरोना काळात मृत्यू झालेल्यांची नोंद करण्याची संख्या वाढली आहे. त्यात कोरोनामुळे निधन झालेले अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.