शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
2
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
3
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
4
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
5
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
6
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
7
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
8
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
9
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
10
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
11
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
12
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
13
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
14
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
15
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
16
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
17
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
18
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
19
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
20
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातशिवाय राजकारणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:34 IST

प्लास्टिकबंदी ही पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीला विरोध करण्याचे काही कारणच नाही. मात्र काही लोकांना गुजरातचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर केली.

ठळक मुद्देधावता दौरा : भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतली बुथगठन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्लास्टिकबंदी ही पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीला विरोध करण्याचे काही कारणच नाही. मात्र काही लोकांना गुजरातचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर केली.भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे हे रविवारी अचानकपणे नांदेडला आले. नांदेडमध्ये त्यांनी भाजपाच्या बुथगठन संदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना दानवे म्हणाले, एक बुथ २५ युथ अशी भाजपाची बुथरचना राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. राज्यभर बुथगठनचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आपण राज्याच्या दौऱ्यावर आहे. परभणीनंतर नांदेडचा आढावा घेतला. सोमवारी औरंगाबादमध्ये असल्याचेही ते म्हणाले. प्लास्टिकबंदी निर्णयाला भाजपाचा विरोध असण्याचे कारण नाही.पर्यावरणाच्या दृष्टीने राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. गुजरातमधून राज्यात सर्वाधिक प्लास्टिक येते, असे पर्यावरणमंत्री कदम यांनी म्हटले होते. त्याबाबत दानवे म्हणाले, गुजरातचे नाव घेतल्याशिवाय अनेकांचे राजकारणच होत नाही. राज्यात प्लास्टिक गुजरातमधून येवो अथवा कोठूनही येवो त्यावर शासन निश्चितपणे कारवाई करेल. भाजपा या निर्णयाच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते संदर्भातील विषयात प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपल्यापर्यंत हा विषय आतापर्यंत आलाच नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भाजपाच्या गुरप्रितकौर सोडी यांची नियुक्ती करण्यासंदर्भात महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी पत्र दिले. त्यानंतरही नियुक्ती झाली नाही.खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा विषय निकाली काढण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या होत्या. असे असले तरीही आजही नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर नेमणूक झालीच नाही. उलट विरोधीपक्ष नेते कक्षाला सील ठोकण्यात आले आहे. याबाबत आपण माहिती घेऊ, असेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाऊराव देशमुख, आ. तुषार राठोड, संजय कौडगे, दिलीप कंदकुर्ते, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, चैतन्य देशमुख, स. दिलीपसिंघ सोडी, बाळासाहेब पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Nandedनांदेडraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा