कंधारमध्ये किराणा साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:09+5:302021-05-30T04:16:09+5:30
शहरात दोन दुचाकी चोरीला शहरातील भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरट्याने लंपास केल्या. तराेडा बु. ...

कंधारमध्ये किराणा साहित्याची चोरी
शहरात दोन दुचाकी चोरीला
शहरातील भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरट्याने लंपास केल्या. तराेडा बु. येथे संभाजी सीताराम कल्याणकर यांची रॉयल इनफिल्ड या कंपनीची ४० हजार रुपयांची दुचाकी लंपास करण्यात आली. तर सय्यद शाकेर सय्यद पाशा यांच्या मंहमदीया कॉलनी येथील घरासमोरून बजाज कंपनीची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विहिरीतील विद्युत मोटार लांबविली
तालुक्यातील बोंढार शिवारात विहिरीतील विद्युत मोटार लंपास करण्यात आली. ही घटना २८ मे रोजी घडली. नितीन विश्वनाथ काेकरे यांनी शेतातील विहिरीत २० हजार रुपये किमतीची मोटार बसविली होती. चोरट्याने रात्रीच्या वेळी विहिरीत उतरुन ती काढून नेली. या प्रकरणात लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
नांगरणी करण्यावरून शेतकऱ्याला मारहाण
हदगाव तालुक्यातील मनाठा येथे एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. शेषराव धोंडीबा ढाले हे शेतात नांगरणी करीत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. शेतमालकाने मला पैसे दिले नाही त्यामुळे तुम्ही नांगरणी करु नका असे म्हणून ढाले यांच्यासोबत वाद घालत लाकडाने मारहाण केली. या प्रकरणात मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गोठ्यातून मोह फुलाचे रसायन जप्त
माहूर तालुक्यातील मौजे पानोळा शिवारात एका गोठ्यात ठेवलेले मोह फुलाचे दोन हजार रुपये किमतीचे रसायन जप्त करण्यात आले. २८ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.