जप्त केलेल्या गाडीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST2021-04-13T04:17:03+5:302021-04-13T04:17:03+5:30
शेतीचा फेरफार करण्यावरून वाद नांदेड - कंधार तालुक्यातील मौजे पाताळगंगा येथे शेतीचा फेरफार करण्याच्या कारणावरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न ...

जप्त केलेल्या गाडीची चोरी
शेतीचा फेरफार करण्यावरून वाद
नांदेड - कंधार तालुक्यातील मौजे पाताळगंगा येथे शेतीचा फेरफार करण्याच्या कारणावरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत. या घटनेत आरोपीने फिर्यादीला खाटेवर झोपविले तर दुसऱ्या आरोपीने त्यास विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला.
घरासमोर ठेवलेली दुचाकी जप्त
नांदेड - तालुक्यातील जानापुरी येथे घरासमोरील अंगणात उभी असलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी येवले यांनी आपल्या घरासमोर दुचाकी उभी केली होती. ३५ हजार रुपये किमतीची ही गाडी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणाचा अधिक तपास सोनखेड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल हंबर्डे हे करीत आहेत.