शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशहून कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या दोन मजुरांना टिप्परने चिरडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:11 IST

दिल्लीहून निघालेले मजूर १८ मार्च रोजी सकाळी नांदेड येथे आले आणि आठवडाभरातच त्यांचा मृत्यू झाला.

नांदेड: पोटाची खळगी भरण्याकरिता उत्तरप्रदेशातून कामाच्या शोधात नांदेड येथे आलेल्या दोन मजुरांना भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना बुधवारी ( दि. २३) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास विष्णूपुरी परिसरातील घडली. शिवकुमार राजभर (वय-४२ वर्षे, रा. अमहरा ता. रसडा जि. बलीया) व मनोजकुमार मनता (वय-३०, रा. शिवराबहादूरगंज ता. काशमाबाद जि. गाजीपुर) अशी मृतांची नावे आहेत. तर भरत जयनारायण राजभर (वय- २८, रा. राजापूर, ता. मोहम्मदाबाद जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश) हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. 

उत्तर प्रदेशातील तीन मजूर सेंट्रींगचे काम करण्यासाठी १६ मार्च रोजी दिल्ली येथून नांदेडकडे निघाले. दिल्लीहून निघालेले मजूर १८ मार्च रोजी सकाळी नांदेड येथे पोहोचले. हे तिघेजण कामाच्या शोधात नांदेड शहर व परिसरातच फिरत होते. दरम्यान, भरत जयनारायण राजभर, शिवकुमार शिवगोविंद राजभर व मनोज कुमार मनता हे तिघेजण २३ मार्च रोजी रात्री पावणेबारा वाजेच्यादरम्यान, नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील 'असर्जन' नाक्यापासून रस्त्याच्या डाव्या बाजूनेच 'विष्णूपुरी'कडे पायी जात होते. 

विष्णूपुरी रस्त्यावरील गुरूद्वारासमोर गेले असता, पाठीमागून लातूर फाटा येथून वाडी पाटीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या (एमएच- ४०, वाय-३५७७) टिप्परने तिघांना उडवले. यात शिवकुमार राजभर (वय-४२ वर्षे, रा. अमहरा ता. रसडा जि. बलीया) व मनोजकुमार मनता (वय-३०, रा. शिवराबहादूरगंज ता. काशमाबाद जि. गाजीपुर) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. तसेच भरत राजभर हे देखील जखमी झाले. 

दरम्यान, टिप्परचालकाने रुग्णवाहिका बोलावून जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून शिवकुमार राजभर व मनोजकुमार मनता यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. ज्ञानोबा गिते यांनी दिली. याप्रकरणी भरत जयनारायण राजभर (वय- २८, रा. राजापूर, ता. मोहम्मदाबाद जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश) यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीआधारे आरोपी टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. प्र. पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. महेश कोरे तसेच पोलीस नाईक सुनील गटलेवार हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू