शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

शेतकरीपुत्राचा आदर्श! सरकारी नोकरीची पहिली कमाई विठ्ठल चरणी; गावात उभारणार सभामंडप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:45 IST

यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही राहुल कदम आपल्या मातीची आणि गावाची नाळ विसरले नाहीत.

- शरद वाघमारेमालेगाव ( जि. नांदेड) : अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयात वर्ग-२ ची नोकरी मिळवलेल्या एका शेतकरीपुत्राने सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. अर्धापूर तालुक्यातील देगाव कु येथील राहुल सुदामराव कदम यांनी आपल्या पहिल्या महिन्याचा संपूर्ण पगार गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक सभा मंडपाच्या बांधकामासाठी अर्पण करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

मोजकी शेती आणि घरची हलाखीची परिस्थिती असूनही राहुल कदम यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना नुकतेच मिळाले. काही दिवसांपूर्वीच त्यांची मुंबई येथील मंत्रालयात मतदान विभागात स्टेनोग्राफर, वर्ग २ या पदावर नियुक्ती झाली. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही राहुल कदम आपल्या मातीची आणि गावाची नाळ विसरले नाहीत.

गावातील सामाजिक कार्याला हातभारदेगाव कु येथे सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक सभामंडपाचे काम सुरू आहे. या कामासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत. या सामाजिक कार्यात आपलेही योगदान असावे या उदात्त भावनेतून राहुल कदम यांनी आपल्या नोकरीतील पहिला-वहिला पगार गावातील ज्येष्ठ नागरिक आणि गावकऱ्यांच्या समक्ष नुकताच विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी अर्पण केला. गावात उभे राहत असलेले हे सांस्कृतिक सभामंडप गोरगरीब कुटुंबातील विवाह सोहळे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

माझा खारीचा वाटानोकरी लागल्यानंतर पहिला पगार स्वतःच्या गरजांसाठी न वापरता, गावातील समाजोपयोगी कामासाठी देण्याचा राहुल कदम यांचा हा निर्णय खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि मोठ्या मनाचे गावातून तसेच पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे. संघर्षातून मिळालेले यश समाजकार्यासाठी वापरणाऱ्या या शेतकरीपुत्राने इतरांसाठीही एक दीपस्तंभ उभा केला आहे. याबाबत बोलताना कदम म्हणाले की, "गावात उभारण्यात येत असलेले सांस्कृतिक सभामंडप गोरगरिबांचे लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल. या कामात आपलेही योगदान असावे या भावनेतून मदत करण्याचा निर्णय घेतला. मी खारीचा वाटा देऊ शकलो याचा खूप आनंद आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's son donates first salary for village temple and hall.

Web Summary : Overcoming hardship, a farmer's son, Rahul Kadam, donated his first salary to his village temple and community hall after securing a government job, exemplifying social responsibility and inspiring others.
टॅग्स :Nandedनांदेडsocial workerसमाजसेवक