शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

नांदेडमधील पर्जन्यमापक यंत्रणाच बंद; पावसाची नोंद करणार कुठे, नुकसान भरपाई मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:51 IST

गत चार दिवसात सर्व तालुक्यात दररोज इतकाच पाऊस झाल्याची आकडेवारी पर्जन्यमापक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नांदेड : मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात आठ दिवसांपासून ठाण मांडून आहे. मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसाने केवळ जनजीवन विस्कळीत झाले नसून पाऊस मोजणारी पर्जन्यमापक यंत्रणासुद्धा बंद पडली आहे. त्यामुळे कोणत्या मंडळात किती पाऊस झाला याची नोंद सध्यातरी शासनदरबारी होत नाही. परिणामी एखाद्या मंडळात अतिवृष्टी झाल्यास त्याचे मोजमाप कसे करणार व नुकसान भरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात आणखी चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. रविवारी ऑरेंज तर त्यानंतर तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. मे महिन्याच्या प्रारंभी अवकाळीने दाणादाण उडवली. उर्वरित पीके व खरीप पेरणीच्या पूर्वतयारीवर मान्सूनपूर्व पावसाने पाणी फिरवले आहे. वादळी वारे व वीज पडून जीवित हानीसह लाखमोलाचे पशुधनही गमवावे लागते. त्यात शेतातील पिके, फळबागा व भाजीपाला जमीनदोस्त झाला आहे. दोन्ही बाजूने नुकसान झाल्याने शेतकरी, मजूरवर्ग मेटाकुटीला आला आहे. रणरणत्या उन्हात राबून मशागत करून तयार केलेली जमीन मान्सूनपूर्व पावसाने चिखलात रुतली आहे. आता सुरू असलेल्या पावसावर पेरणी उरकली व ऐन पावसाळ्यात उघड दिली तर बियाणे करपण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वच बाजूने शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

२४ तासात ११ मि.मी. पाऊस?जिल्हा यंत्रणेकडून गत २४ तासात ११ मि.मी. पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. त्यात नांदेड- ९.५, बिलोली-१२.२, मुखेड- १०, कंधार-९.२, लोहा-५.५, हदगाव-११.८, भोकर-११.४, देगलूर-१३, किनवट-२.९, मुदखेड-३.९, हिमायतनगर-१.५, माहूर-००, धर्माबाद-३.२, उमरी-०.९, अर्धापूर-५.० व नायगाव तालुक्यात २.१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, गत चार दिवसात सर्व तालुक्यात दररोज इतकाच पाऊस झाल्याची आकडेवारी पर्जन्यमापक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. वातावरणाच्या नोंदी घेणारी स्कायमेट यंत्रणा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेली असताना ही आकडेवारी आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी