शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या पायाला त्रास झाला; भानामतीच्या संशयावरून वृद्धास भरचौकात मारहाण, जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 14:04 IST

जीवघेणा अंधश्रद्धेचा पगडा; भानामतीच्या संशयावरून वृद्धास गावातील चौकात अन् मंदिरासमोरही केली मारहाण

नरसीफाटा/शंकरनगर (जि. नांदेड) : अंधश्रद्धेचा पगडा अजूनही ग्रामीण भागात आहे. एका अठरावर्षीय मुलीला करणी करून भानामती केल्याच्या संशयावरून ८५ वर्षीय वृद्धास भरदुपारी गावातील मंदिरासमोर, चौकात अन् चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण केली. यामध्ये सदर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी तिघांविरोधात रामतीर्थ ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील हनमंत काशीराम पांचाळ (वय ८५) यास आरोपींनी त्यांच्या घरी नेऊन तसेच गावातील मंदिरासमोर, चौकात आणि गावातच असलेल्या चिंचेच्या झाडाला बांधून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. वामन डुमणे यांच्या मुलीवर मयत हनमंत पांचाळ याने करणी, भानामती केली, असा आरोप करत रत्नदीप वामन डुमणे, वामन डुमणे (दोघेही रा. गागलेगाव) आणि दयानंद वाघमारे (रा. कागंठी) या तिघांनी संगनमत करून त्यास मारहाण केली.

आरोपीने १ मार्च रोजी दुपारी आरोपी पांचाळ यास घरी नेले. या ठिकाणी ‘तू मुलीवर करणी, भानामती केलास,’ असे म्हणून मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी मंदिरासमोर आणि झाडाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत वयोवृद्ध हनमंत पांचाळ याचा जागीच मृत्यू झाला; परंतु गावातील कोणीही त्यांना अडविण्याचा अथवा वाचविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे बघ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे आणि फौजदार शेख लतीफ, बीट जमदार पठाण यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी बिलोलीच्या रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी १ मार्च रोजी रात्री उशिरा मारोती नागनाथ पांचाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी वामन डुमणे, रत्नदीप वामन डुमणे आणि दयानंद वाघमारे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे हे करीत आहेत.

तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यातया घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर लगेचच आरोपी रत्नदीप वामन डुमणे व दयानंद वाघमारे यांनी गावातूनच अटक केली. त्यानंतर २ मार्च रोजी सकाळी तिसरा आरोपी वामन डुमणे यास दुपारी एका शेतातून ताब्यात घेतले.

मुलीच्या पायाला व्हायचा त्रास...वामन डुमणे यांच्या अठरावर्षीय मुलीवर मयत हनमंत पांचाळ याने करणी केल्याचा संशय डुमणे कुटुंबीयांना होता. त्यातूनच त्यांनी हनमंत पांचाळ यास मारहाण केली. सदर मुलीला पायाला त्रास होत असे. हा त्रास भानामती अन् करणीमुळेच झाल्याचा संशय कुटुंबीयांना होता. त्याच रागातून मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड