शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:45 IST

पहिल्या अपघातात डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली, परंतु काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले.

हदगाव (नांदेड) : तालुक्यातील कवठा येथील गजानन मंदिराजवळ एका तरुणाचा दुहेरी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मयत तरुण आशिष विजयराव देशमुख (वय ३१) हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते. सध्या ते हदगाव तालुक्यातील निवघा येथील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

५ जुलै रोजी सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान, ते बुलेट (क्र. एमएच ३७ एजी ५९५९) वरून निवघा येथून हदगावकडे जाताना, गजानन मंदिर, कवठासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली असती, परंतु त्या अपघातातून सावरायच्या आत, काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुमित चौरे, पप्पू जाधव, दत्ता जाधव आणि त्रिभुवन चव्हाण यांनी अपघाताची माहिती दिली.

आनंदाचा दिवस दु:खात बदलला६ जुलै रोजी त्यांच्या सोयरीकीचा दिवस ठरलेला होता. आशिष यांना पसंतीची मुलगी लाभली होती. कुटुंबीयांनी त्याच दिवशी सोयरीक निश्चित केली होती. मात्र, नियतीच्या विचित्र खेळात, आनंदाचा दिवस दु:खात बदलला. त्यांच्या पश्चात आई, चार काका, सहा भाऊ, बहिणी असे मोठे एकत्रित कुटुंब आहे. त्यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, हदगाव येथून त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड