शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

देश एका सैनिकाला मुकला; सैन्यात निवड झालेल्या तरुणाचा गोदापात्रात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:03 IST

सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

नांदेड: सैन्य भरतीत निवड झाल्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरूणाचा मित्रांसोबत गोदापात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना २३ मे रोजी दुपारी सव्वादोन वाजेदरम्यान विष्णूपुरी परिसरातील काळेश्वर मंदिराच्यामागील गोदावरी नदी पात्रात घडली. या दुर्दैवी घटनेने देश एका सैनिकाला मुकला आहे.

लोहा तालुक्यातील वाळकी खुर्द येथील रहिवासी संतोष पंडीतराव कदम ( २१ ) याची काही दिवसांपूर्वी सैन्यात निवड झाली होती. २३ मे रोजी विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सैन्यात निवड झालेल्या तरूणांची वैद्यकीय तपासणी होती. यामुळे संतोष मित्रांसोबत विष्णूपुरी येथे आला. वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी २ वाजेच्या दरम्यान संतोष मित्रांसोबत विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वरांच्या मंदिरात दर्शनासाठी गेला. 

दर्शनानंतर बाजूच्या गोदापात्रात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने संतोषचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मृत संतोषचे काका सुरेश शंकर कदम यांनी दिली असल्याचे ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस अंमलदार तुकाराम नागरगोजे यांनी सांगितले. या प्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल माधव गवळी अधिक तपास करीत आहेत. मृत संतोषच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व बहिण असा परिवार आहे. दरम्यान, संतोषचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने वाळकी व कापशी गुंफा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यू