शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

पोलिस दिसले अन् चोरट्याने धूम ठोकली; पाठलागानंतर शस्त्रधारी चोरटा पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:49 IST

चोरीचा प्रयत्न फसला; शस्त्रासह चोरटा पोलिसांच्या गळाला

- मारोती चिलपिपरे कंधार : शहरातील एका पेट्रोल पंपाजवळ चोरीचा प्रयत्न करण्यासाठी थांबलेल्या चोरट्याच्या नजरेत अचानक पोलिसांचा फौज फाटा पडला अन् चोरट्याने तेथून धूम ठोकली. पोलिसांनीही पाठलाग करून त्यास पकडले.  त्याच्याजवळ दोन खंजर आणि लोखंडी शस्त्र सापडले आहेत. हा सर्व प्रकार २२ मार्च रोजी पहाटे शहरातील महेश पेट्रोल पंपाजवळ घडला.

कंदार पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. एस. पडवळ, होमगार्ड सुरेश गीते, आदमपुरे व शेंडगे आदी कर्मचारी २१ मार्च रोजी रात्री  शहरात गस्त घालत होते. २२ मार्च रोजी पहाटे साधारणता पावणेचार वाजण्याच्या सुमारास महेश पेट्रोल पंप जवळ नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना पाहताच एक व्यक्ती पेट्रोल पंपाच्या पाठीमागून पळत सुटला. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिस निरिक्षक आर. एस. पडवळ, उपनिरीक्षक मुखेडकर, होमगार्ड सुरेश गिते यांनी चोरट्याचा पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंग झडती घेउन त्याच्याकडील दोन खंजीर,  एक लोखंडी हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. 

दरम्यान,  चोरट्याला त्याचे नाव विचारले असता सुरुवातीला त्याने बनावट नावे सांगितली; परंतु पोलिसी खाक्या दाखवताच माधव किशन भोसले असे नाव सांगितले असून, तो लोहा तालुक्यातील भेंडेगाव येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीने यापूर्वी अनेक वेळा घरपोडी, चोरीचे गुन्हे केले असून, हे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड