जमावाच्या तावडीतून आरोपीला काढले बाहेर; विनयभंग करणाऱ्याला चांगलेच बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2024 20:01 IST2024-01-18T20:01:22+5:302024-01-18T20:01:44+5:30
त्या प्रकरणातील आरोपी समजून केली मारहाण

जमावाच्या तावडीतून आरोपीला काढले बाहेर; विनयभंग करणाऱ्याला चांगलेच बदडले
नांदेड - रोही पिंपळगाव येथील घटना ताजीच असताना एका शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या युवकाला जमावाने बेदम चोप दिला. त्या प्रकरणातील हा आरोपी असल्याचे समजून जमाव वाढत गेला. परंतु, वेळेत पोलीस पोहोचल्याने सदर आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
सदर युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुदखेड पोलिस करत आहे. मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील एका शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेला चार दिवस लोटत नाहीत, तोच याच परिसरातील एका शालेय विद्यार्थीनीचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न एका भंगार वेचणाऱ्या युवकाने केला. मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी सदर आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.