शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:47 IST2018-07-01T00:46:59+5:302018-07-01T00:47:36+5:30
वेतन का काढत नाही म्हणून एका शिक्षकाने दुस-या शिक्षकाच्या घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नवीन नांदेड भागातील हडको येथे २०१२ मध्ये घडली होती़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला़

शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वेतन का काढत नाही म्हणून एका शिक्षकाने दुस-या शिक्षकाच्या घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नवीन नांदेड भागातील हडको येथे २०१२ मध्ये घडली होती़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला़
किशन येवते हे संत मोतीराम महाराज हायस्कूल, कारेगाव येथे शिक्षक आहेत़ १५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास किशन येवते हे पत्नी देवशाला येवते यांच्यासोबत हडको येथील आपल्या घरी बोलत बसले होते़ त्याचवेळी दरवाजाची बेल वाजली़ दरवाजावर गणपतराव मोरे विद्यालय, किवळा येथील शिक्षक राजेश नागनाथ वाघमोडे हे आले असल्याचे किशन येवते यांना दिसले़ त्यानंतर किशनराव येवते यांनी दरवाजा उघडला़
दरवाजा उघडताच राजेश वाघमोडे याने येवते यांना पगार का काढत नाहीस म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ त्यानंतर येवते यांना काही कळायच्या आता वाघमोडे याने चाकू येवते यांच्या पोटात घुसविला़
येवते यांच्या किंकाळण्याच्या आवाजाने पत्नी देवशाला दरवाजाजवळ आल्या़ यावेळी त्यांनी आरोपी वाघमोडे यांना बाहेर ढकलून दिले़ त्यानंतर शेजाºयांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी देवशाला येवते यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता़ पोनि़एस़आऱ उणवणे यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़
न्यायालयाने या प्रकरणात सात साक्षीदार तपासले़ त्यानंतर आरोपी शिक्षक राजेश वाघमोडे याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सरकारच्या वतीने अॅड़ अमरिकसिंघ वासरीकर यांनी बाजू मांडली़