शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:38 IST

तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.

नांदेड : तालुक्यातील गोदावरी नदीतून विविध ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रक (हायवा) नांदेड तहसीलच्या विशेष पथकाने जप्त केले असून १९ जूनच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार किरण अंबेकरसह नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, तलाठी राहूल चव्हाण आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.नांदेड तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. तरीही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. नांदेड तहसिल कार्यालयाने वाळू चोरी संदर्भात वेळोवेळी कारवाई करत मराठवाड्यात पहिल्यांदाच जिलेटीन कांड्याच्या स्फोटाने वाळू उपसा करणारा सक्क्षण पंप उध्वस्त केला होता. त्यानंतर कारवाया सुरूच होत्या. १९ जूनच्या रात्रीही तहसीलदार अंबेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी गस्त घातली. या गस्ती दरम्यान गंगाबेट येथे पहाटे अडीच वाजता १० हायवा वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. दोन ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू होते. या कारवाईत एम.एच.२६, बीई २३०७, एम.एच.२६, बीई २८५०, एम.एच.२६, बीई ७२२८, एम.एच.२६, बी.ई. ४३०७, एम.एच.०४/ जीएफ ७८७८, एम.एच. ४५-११३७, एम.एच.२६-बीई १७०९, एम.एच.२४/एबी ८१८७, एम.एच.२९/ डीसी २२० (एम.एच.२६/६६५५) आणि अन्य एक क्रमांक नसलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेली ही सर्व वाहने नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मंडळ अधिकारी के.एम. नागरवाड, तलाठी एच.जी. पठाण यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात वाळू चोरी प्रकरणी तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी नांदेड तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या प्रत्येक वाहनाला २ लाख १० हजार ४०० रुपये दंड आकारला आहे. या कारवाईत २१ लाख ४ हजार रुपये एकूण दंड आकारण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण, मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, के.एम. नागरवाड, तलाठी उमाकांत भांगे, मंगेश वांगीकर, ईश्वर मंडगीलवार, कैलास सूर्यवंशी, सचिन नरवाडे, राहूल चव्हाण आदींनी केली.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूriverनदी