शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अपडेट व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:52+5:302021-02-25T04:21:52+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ...

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अपडेट व्हावे
जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सूचित केले होते. त्यानुसार, वेगवेगळ्या विभागांच्या बैठका पार पडल्या. मंगळवारी शिक्षण विभागाच्या बैठकीच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. शाळास्तरावर शाळेचा भौतिक विकास यासह मुलांच्या गुणवत्तेकडे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विद्यार्थी इंग्रजी बोलण्यासाठी संकोच करतात. विद्यार्थ्यांना इंग्रजीचा सराव होईल, या पद्धतीने काही मॉडेल विकसित करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्काउट आणि गाइड विभागाच्या वतीने स्काउटचे जिल्हा संघटक दिगंबर करंडे, गाइडच्या जिल्हा संघटक शिवकाशी तांडे व प्रलोभ कुलकर्णी यांनी रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, डी.एस. मठपती, अधीक्षक बळीराम येरपूलवार, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास ढवळे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार यांची उपस्थिती होती.