छत्रपती शिवाजी महाराजांपासून मानसिक निर्भयपणा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:39+5:302021-06-09T04:22:39+5:30
यशवंत महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शिवस्वराज्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे मार्गदर्शन व नियोजनानुसार संपन्न ...

छत्रपती शिवाजी महाराजांपासून मानसिक निर्भयपणा शिकवा
यशवंत महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शिवस्वराज्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे मार्गदर्शन व नियोजनानुसार संपन्न झालेल्या यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत ' शिवचरित्रापासून काय शिकावे?' या विषयावर तेे बोलत होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. संगीता घुगे, प्रा. डॉ. मीरा फड, प्रा. डॉ. कविता सोनकांबळे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड आणि प्रा. डॉ. अजय गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. मुटकुळे म्हणाले की, स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत वाटा देणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज जगामध्ये ५०पेक्षा जास्त देशांमध्ये शिवचरित्राचा अभ्यास केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब व्हियेतनामने केला. शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन इस्रायलने कार्यक्षम गुप्तहेर यंत्रणा निर्माण केली. जमीन नांगरणीपासून पीक घरापर्यंत येईपर्यंतची शासन व्यवस्था म्हणजे स्वराज्य होते.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगीता घुगे यांनी, तर आभार प्रा. डॉ. अजय गव्हाणे यांनी मानले.
या व्याख्यानास प्रा. डॉ. एल. व्ही. पद्मा राव, प्रा. डॉ. संगीता शिंदे, प्रा. डॉ. संजय नन्नवरे, प्रा. डॉ. एम. एम. व्ही. बेग, प्रा. व्ही. जी. स्वामी, प्रा. डॉ. विजय भोसले, प्रा. डॉ. नीरज पांडे, प्रा. डॉ. बालाजी भोसले, प्रा. डॉ. पी. बी. पाठक, प्रा. डॉ. धनराज भुरे, प्रा. डॉ. मंगल कदम, प्रा. संगीता चाटी, प्रा. डॉ. व्ही. सी. बोरकर, प्रा. डॉ. मंजुश्री देशमुख, प्रा. डॉ. विजयसिंह ठाकूर, प्रा. डॉ. जी. बी. चौशष्टे आदींची उपस्थिती होती.