कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST2021-05-18T04:19:00+5:302021-05-18T04:19:00+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सलीम तांबे यांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचे निदान कसे करावे? त्यावरील उपचार व ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांची काळजी घ्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सलीम तांबे यांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचे निदान कसे करावे? त्यावरील उपचार व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती दिली. तसेच तिसऱ्या लाटेत बालकांची अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी कोरोनामुळे होणारे मानसिक ताणतणाव व सामाजिक स्वास्थ्य कसे निरोगी राहील? कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये मानसिक व सामाजिक समस्या उद्भवतात. त्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत करणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी. नागरिकांमध्येही जनजागृती करावी, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
चौकट--------------------
२४४ गावे झाली कोरोनामुक्त- डॉ. शिंदे
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २५८ गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यातील २४४ गावे आता कोरोनामुक्त झाले असून केवळ १४ गावामध्ये कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाच्या उच्चांकी काळात १२ हजार रुग्ण ग्रामीण भागात आढळले होते. ते आता १८०० वर आले आहे. कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३० टक्के होते. ते आता १० टक्क्यावर आले आहे. जितक्या वेगात कोरोनाचा प्रसार झाला त्याच वेगात कमी झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.