राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST2021-07-07T04:22:46+5:302021-07-07T04:22:46+5:30
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केल्यानंतर मंगळवारी राज्यभरात भाजपच्या वतीने ...

राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केल्यानंतर मंगळवारी राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा या ठिकाणी आणून जाळला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलनात सरचिटणीस विजय गंभीरे, व्यंकटराव मोकले, अशोक पाटील धनेगावकर, महेश बाळू खोमणे, दीपकसिंह रावत, अभिषेक सौदे, शीतल खांडिल, अनिलसिंह हजारी, शीतल भालके, संजय अंभोरे, व्यंकटेश जिंदम, साहेबराव गायकवाड, भटक्या विमुक्त आघाडीचे नरेंद्र बैस, चिटणीस विपुल मोळके, सुनील राणे, मारोती वाघ, शततारका पांढरे यांची यावेळी उपस्थिती होती.