सफाई कर्मचारी, कामगारांचे प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:28 IST2020-12-05T04:28:24+5:302020-12-05T04:28:24+5:30

कार्यालयीन अधीक्षक तथा स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी प्रस्तावना केली. समन्वयक स्टॅलिन आडे यांनी सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा ...

Sweepers, Workers Training Camp | सफाई कर्मचारी, कामगारांचे प्रशिक्षण शिबिर

सफाई कर्मचारी, कामगारांचे प्रशिक्षण शिबिर

कार्यालयीन अधीक्षक तथा स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी प्रस्तावना केली. समन्वयक स्टॅलिन आडे यांनी सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानाबाबत मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी ओला व सुका कचरा वर्गीकृत स्वरूपात गोळा करण्याबाबतचे महत्व विषद केले. शहरात दोन वेळेस करण्यात येणारी झाडझूड साफसफाई या अनुषंगाने सर्व कामे अत्यंत जबाबदारीपूर्वक पार पडावी असे निर्देश मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी दिले.

घंटागाडी चालक महेश सुद्दलवाड, रमेश बामणे, महेंद्र सुद्दलवाड यांना व नप सर्व सफाई कामगार शाम कालगोटवार, बाबू कलेपेल्लीवर, गंगुबाई गंगारेड्डी यांचा मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार व सर्व सभापती, नगरसेवक यांचे सहकार्य लाभले आहे. आभार चंद्रकांत दुधारे यांनी मानले.

Web Title: Sweepers, Workers Training Camp