शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ निवडणुकीत १३ विभागप्रमुख बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:42 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील चार विद्याशाखेच्या २९ अभ्यास मंडळासाठी विभागप्रमुखांमधून प्रत्येकी तीन प्रतिनिधींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. यातील १६ अभ्यास मंडळाच्या प्रतिनिधीसाठींचा निकाल बुधवारी पहाटे जाहीर करण्यात आला. तेरा अभ्यास मंडळाच्या तीन विभागप्रमुखांची बिनविरोध निवड यापूर्वीच झाली आहे.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील चार विद्याशाखेच्या २९ अभ्यास मंडळासाठी विभागप्रमुखांमधून प्रत्येकी तीन प्रतिनिधींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. यातील १६ अभ्यास मंडळाच्या प्रतिनिधीसाठींचा निकाल बुधवारी पहाटे जाहीर करण्यात आला. तेरा अभ्यास मंडळाच्या तीन विभागप्रमुखांची बिनविरोध निवड यापूर्वीच झाली आहे. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ‘कॉम्प्युुटर सायन्स अ‍ॅण्ड कॉम्प्युुटर अप्लिकेशन’ या अभ्यास मंडळावर डॉ. सुधीर जगताप, डॉ.प्रकाश खणले, डॉ. सुहास सातोनकर, ‘डेअरी सायन्स’ या अभ्यास मंडळावर डॉ. किरण दंडे, डॉ. ए.एस. हेंबडे, डॉ.अशोक पाटील, ‘इन्व्हार्नमेंटल सायन्स’ या अभ्यास मंडळावर डॉ.जयप्रकाश पटवारी, डॉ.राजकुमार पावले, डॉ.सुधीर शिवणीकर, ‘फिशरी सायन्स’या अभ्यास मंडळावर डॉ.जयप्रकाश गायकवाड, डॉ.सुनील पाटील, डॉ. एन. जी. पापटवार, ‘गणित’ या अभ्यास मंडळावर डॉ.के.एल. बोंदार, डॉ. आर. एन. इंगळे, भालचंद्र करंडे, ‘सूक्ष्मजीवशास्त्र’या अभ्यास मंडळावर डॉ. राजेंद्रप्रसाद अवस्थी, डॉ.एस.एम. मोरे, डॉ. प्रशांत वक्ते हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ‘वनस्पतीशास्त्र’ या अभ्यास मंडळावर डॉ. राहुल अल्लापूरकर, डॉ.अंबादास कदम, डॉ. दिगंबर मोरे, ‘रसायनशास्त्र’ अभ्यास मंडळावर डॉ. संभाजी कबाडे, डॉ. सुधाकर पाटील, डॉ. डी. के. स्वामी, ‘इलेक्ट्रॉनिक सायन्स’ या अभ्यास मंडळावर डॉ. मल्लिकार्जुन स्वामी, डॉ.अशोक जाधव, डॉ. अशोक लाठी, ‘भौतिकशास्त्र’ या अभ्यास मंडळावर डॉ. हेमंत बक्षी, डॉ.एस.डी.मिसळ, डॉ. भास्कर मुंढे, ‘प्राणीशास्त्र’या अभ्यास मंडळावर डॉ. हनुमंत जगताप, डॉ. रवींद्र सोळुंके, डॉ. बाळासाहेब साळवे हे निवडणुकीद्वारे निवडून आले. 

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाख्येच्या ‘अकॉऊंटस अ‍ॅण्ड अप्लाईड स्टॉटिस्टिक्स’या अभ्यास मंडळावर डॉ.एस.एस.अग्रवाल, डॉ. हनमंत कुलकर्णी, डॉ.एस.एम.टाले, ‘बिसनेस इकॉनॉमिक्स’ या अभ्यास मंडळावर डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. संजयकुमार जाधव, डॉ. बालाजी कोम्पलवार, ‘बिझनेस स्टडीस’या अभ्यास मंडळावर डॉ.नागोराव अवाडे, डॉ.बालू गिते, डॉ.एस.के.खिल्लारे, ‘मॅनेजमेंट सायन्स अ‍ॅण्ड बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन  (एनजीओ मॅनेजमेंट सह)’या अभ्यास मंडळावर डॉ.रामकिशन मुसळे, डॉ.एस.एस. सोळंके, डॉ.आर. व्ही. तानशेत्ते हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत. तर ‘कॉमर्स अ‍ॅण्ड मर्कनटाईल लॉ’ या अभ्यास मंडळावर डॉ.मारोती कचवे, डॉ.आर.एम.भिगानिया आणि डॉ.शिवप्रसाद डोंगरे हे निवडणुकीद्वारे निवडून आले.

मॅनिटीज विद्याशाख्येच्या ‘जिओग्राफी अ‍ॅण्ड अप्लाईड जिओग्राफी’ या अभ्यास मंडळावर डॉ.नरेंद्र्र माळी, मंजुनाथ मानकरी आणि दयानंद उजलाम्बे हे बिनविरोध निवडून आले आहेत. ‘अर्थशास्त्र’या अभ्यास मंडळावर डॉ. माधव पलमंते, डॉ.बी.के.शिंदे, डॉ.एस.एस.पतंगे, ‘इंग्रजी’या अभ्यास मंडळावर डॉ. अजय टेंगसे, डॉ.राजाराम जाधव, डॉ.राविंद नवले, ‘हिंदी’ अभ्यास मंडळावर डॉ.बालाजी भुरे, डॉ.रमेश कुरे, डॉ.रावसाहेब जाधव, ‘इतिहास’ अभ्यास मंडळावर डॉ.ए.एम.कठारे, डॉ. आर. आर. मुटकुळे, डॉ.सुखदेव बलखंडे, ‘मराठी’या अभ्यास मंडळावर डॉ. बी. बी. खंदारे, डॉ. जयरथ जाधव, डॉ.व्ही.एच. जाम्बले, ‘तत्त्वज्ञान’ या अभ्यास मंडळावर डॉ. सखाराम गोरे, डॉ. सुनील साळुंके, डॉ. जी. एम.उपाडे, ‘राज्यशास्त्र’ अभ्यास मंडळावर डॉ. विलास आघाव, डॉ. एस. एस. भालेराव, डॉ.हरिश्चंद्र चौधरी, ‘पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ अभ्यास मंडळावर डॉ. गोविंद येमलवाड, डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. पंचशील एकंबेकर, ‘सामाजिकशास्त्र’  अभ्यास मंडळावर डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. नानासाहेब पाटील, डॉ. डी. एस. धारवाडकर, ‘उर्दू’ अभ्यास मंडळावर डॉ. नदाफ मोहमद, डॉ. हमीद अश्रफ, डॉ.इक्बाल जावेद हे निवडणुकीद्वारे निवडून आले.

इंटरडिसिप्लीनरी स्टडीज विद्याशाख्येच्या ‘शारीरिक शिक्षण’ अभ्यास मंडळावर डॉ. सिकंदर देसाई, डॉ. उत्तम देवकत्ते, डॉ. संजय एकंबेकर आणि ‘क्रीडा’ अभ्यास मंडळावर डॉ. मीनानाथ गोमचाले, डॉ. वेंकट माने, डॉ. भास्कर नल्ला रेड्डी हे बिनविरोध निवडून आले आहेत.