शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:52 IST

आता या पेपरची एकाच दिवशी १६ जुलै रोजी होणार पुनर्परीक्षा

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत बी.एस्सी तृतीय वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्येच प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यामुळे १४ जून रोजी घेण्यात आलेले दोन पेपर रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. सदरील दोन्ही पेपर १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून बी. एस्सीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यात १४ जून रोजी बी. एस्सी तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रासाठी परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये पेपर कोड एसबी-०६९ आणि एसबी - ०७१ या विषयांचा समावेश होता. सदरील पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर उघडकीस आला. यासंदर्भात आलेल्या तक्रारी आणि सदर प्रकारामुळे १४ जून रोजी घेण्यात आलेले दोन्ही पेपर रद्द करण्याचे आदेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार आता सदर पेपर एक महिन्यानंतर जुलै महिन्यात होणार आहेत.

दोन्ही पेपर पुन्हा एकाच दिवशीबीएस्सी तृतीय वर्षाचे रद्द करण्यात आलेले पेपर १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या नियोजनानुसार दोन्ही विषयाची पुनर्परीक्षा १६ जुलै रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत होईल. यामध्ये पेपर कोड - एसबी ०६९ (गणित) आणि पेपर कोड एसबी - (प्राणिशास्त्र) विषयांचा समावेश आहे. दोन्ही पेपर एकाच वेळेत एकाच दिवशी होणार आहेत.

घडल्या प्रकाराची चौकशी सुरूलातूर जिल्ह्यातील एका केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आल्या. या प्रकाराची चौकशी सुरू आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. परीक्षेत पारदर्शकात राहावी म्हणून दोन्ही पेपर रद्द केले आहेत. १६ जुलै रोजी पुनर्परीक्षा घेऊन निकालदेखील वेळेवर लावला जाईल.- डी. एम. नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडexamपरीक्षाEducationशिक्षण