शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे श्रीश्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात निषेधाचे पोस्टर, पोलिसांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:56 IST

याप्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षासह सात कार्यकर्त्यांना आज पहाटे जेरबंद केले.

नांदेड: बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षासह सात कार्यकर्त्यांना आज पहाटे जेरबंद केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडिओवरून श्री श्री रविशंकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री एका कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केला होता. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या मामा चौक, कौठा परिसरातील मैदानात बुधवारी ( दि. १ ) संध्याकाळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व अध्यात्मिक गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचा महासत्संगाचा अर्थात गुरूवाणीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तिरूपती भगनुरे (रा. मगनपुरा, नांदेड), माधव शिवाजी वडवळे, शिवराज दत्ता जाधव (रा. कापसी ता. लोहा), निरंजन साहेबराव जाधव (रा. पुयडवाडी) व अजित प्रल्हादराव इंगळे (रा. गणेश नगर, नांदेड) हे निषेधाचे पोस्टर घेऊन कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप करत श्रीश्री रविशंकर यांनी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

याप्रकरणी अंमलदार बालाजी दंतापल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. आनंद बिचेवार यांच्या पथकाने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव दादाराव देवसरकर, जिल्हाध्यक्ष सदानंद संजय पुयड यांच्यासह  तिरूपती भगनुरे (रा. मगनपुरा, नांदेड), माधव शिवाजी वडवळे, शिवराज दत्ता जाधव (रा. कापसी ता. लोहा), निरंजन साहेबराव जाधव (रा. पुयडवाडी) व अजित प्रल्हादराव इंगळे (रा. गणेश नगर, नांदेड) आरोपींना जेरबंद केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड