शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

By प्रसाद आर्वीकर | Updated: March 15, 2024 17:10 IST

रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागात रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच विभागातील संपूर्ण मार्ग इलेक्ट्रिक रेल्वे धावण्यासाठी सज्ज होणार आहे.

रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात साधारणत: दीड वर्षापासून ही कामे सुरू असून, ती आता पूर्णत्वाला जात आहेत. विशेष म्हणजे, काही मार्गांवर आताच इलेक्ट्रिक रेल्वे धावत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सद्य:स्थितीला नांदेड विभागातील ४५०.३९ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या मिरखेल ते नांदेड या साधारणत: ४३ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण शिल्लक आहे. ही कामे काही ठिकाणी दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात आहेत. ३१ मार्चपर्यंत या मार्गावरची संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार असून, एप्रिल महिन्यात नांदेड विभागातील सर्व रेल्वे मार्ग इलेक्ट्रिक रेल्वेसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे.

या मार्गावरून धावतात इलेक्ट्रिक रेल्वेसध्या परळी-परभणी-छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गावरून ६ प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिन जोडून धावतात. तसेच मुदखेड ते आदिलाबाद या रेल्वे मार्गावर एक प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिन जोडून धावतात.

पूर्ण झालेले विद्युतीकरणअकोला जंक्शन ते पूर्णा : २०५.५९ किमीपरभणी ते परळी : ६२.१३ किमीपिंपळखुटी ते मुदखेड जंक्शन : १८३.२६

३११ किमी झाली चाचणीनांदेड-मनमाड या मार्गावर अंकाई ते मुदखेड जंक्शन हे ४२५ किमीचे अंतर असून, त्यापैकी ३११.२४ किमी अंतराची विद्युतीकरणाची चाचणी पूर्ण झाली आहे. परभणी तालुक्यातील मिरखेल ते नांदेड तालुक्यातील मालटेकडीपर्यंतची ४३.३० किमीची कामे शिल्लक आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेMarathwadaमराठवाडाNandedनांदेड