गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:33+5:302021-06-11T04:13:33+5:30

पालीनगर येथील स्वप्निल सिध्दार्थ गायकवाड हा युवक मजुरीचे काम करीत होता. मंगळवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे ...

Suicide of a young man by strangulation | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

पालीनगर येथील स्वप्निल सिध्दार्थ गायकवाड हा युवक मजुरीचे काम करीत होता. मंगळवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी युवकाचे वडील सिध्दार्थ गायकवाड यांनी भाग्यनगर ठाण्यात घटनेची माहिती दिली. या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल लंपास

नांदेड : शहरातील संतकृपा मार्केट येथील एका मोबाइलच्या दुकानातून बॅटरी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकाचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गोकुळनगर येथील गौरव रामकिशनराव कोटगीरे हे दुकानात खरेदीसाठी गेले असता त्यांचा १५ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला.

दाभड शिवारात जुगाऱ्यांना अटक

नांदेड : दाभड शिवारातील एका आखाड्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाड टाकून जुगाऱ्यांना अटक केली. पोलिसांच्या या धाडीत ३८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. याप्रकरणी स्थागुशाचे उपनिरीक्षक आशिष बोराटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Suicide of a young man by strangulation