तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST2021-05-29T04:15:11+5:302021-05-29T04:15:11+5:30
शॉर्टसर्किटमुळे आग नांदेड - तालुक्यातील पावडेवाडी येथील शेतात शॉर्टसर्किटमुळे ज्वारीच्या अडीच हजार पेंढ्या भस्मसात झाल्याने शेतकऱ्याला ४५ हजारांचा फटका ...

तरुणाची आत्महत्या
शॉर्टसर्किटमुळे आग
नांदेड - तालुक्यातील पावडेवाडी येथील शेतात शॉर्टसर्किटमुळे ज्वारीच्या अडीच हजार पेंढ्या भस्मसात झाल्याने शेतकऱ्याला ४५ हजारांचा फटका बसला. शेत गट क्र.१०० ब-१ मधून एलटी लाईन गेली. या तारा लोंबकळलेल्या आहेत. तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. त्यात शेतकरी लक्ष्मण कावळे यांचे ४५ हजारांचे नुकसान झाले. २५मे रोजी ही घटना घडली.
बुद्धजयंती कार्यक्रम
उमरी - शहरातील डॉ. आंबेडकरनगरात बुद्धजयंती कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची पूष्पपूजा, धूप पूजा, दीप पूजा सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर नामवाड यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन कैलास सोनकांबळे यांनी केले. कार्यक्रमाला सिद्धार्थ वाघमारे, शंकर शेळके, तरूण वाघमारे, विशाल सवई, अजीत सोनकांबळे आदी उपस्थित होते.
कवानकर यांना पदोन्नती
बामणीफाटा - कवाना येथील मूळचे रहिवासी तथा औरंगाबाद येथील सीजीएम न्या. अश्विन आल्लेवार कवानकर यांना अतिरिक्त न्यायदंडाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. याबद्दल माहिती अधिकारी तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार व अन्य जणांनी आल्लेवार यांचे स्वागत केले.