सरकारची काटकसर, पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:14+5:302021-06-03T04:14:14+5:30
काय काय मिळते - विविध वयोगटातील लाभार्थ्यांना चवळी, चना, मूगडाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर ...

सरकारची काटकसर, पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर
काय काय मिळते
- विविध वयोगटातील लाभार्थ्यांना चवळी, चना, मूगडाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर आदींचे कोरोना नियमांचे पालन करून वितरण केले जात आहे.
तेलाशिवाय फोडणी कशी द्यायची
- कोराेना महामारीमुळे घरीच पोषण आहार दिला जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तेल मिळत नाही. तेलाचे भाव वाढल्यापासून साखर दिली जात आहे. शासनाने साखरेऐवजी खाद्य तेलाचा पुरवठा करावा. - चंद्रकलाबाई वाघमारे,
- मागील काही दिवसांपासून तेलाऐवजी साखर दिली जात असल्याने पोषण आहाराला फोडणी कशी द्यायची असा प्रश्न पडला आहे. याबाबत कोणाला विचारले तर शासनानेच तेल बंद केल्याचे सांगितले जात आहे. - वनमाला उफाडे,
- खाद्य तेलाचे भाव १७० ते १९० रूपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे गरिबांच्या घरी तेलाची फोडणी गायबच झाली आहे. शासनाकडून पोषण आहारात खाद्य तेल मिळत होते. मात्र ते बंद झाल्याने अधिकच अडचण निर्माण झाली आहे. - संगीताबाई कांबळे