व्याजाचे पैसे परत करण्याचा तगादा, एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:57 IST2017-11-17T23:56:56+5:302017-11-17T23:57:06+5:30
व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्याला कंटाळून शेतकरी गणेश नागोराव पाटील यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ आत्महत्या करताना त्यांनी कंबरेला मोठा दगड बांधला होता़

व्याजाचे पैसे परत करण्याचा तगादा, एकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लापूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्याला कंटाळून शेतकरी गणेश नागोराव पाटील यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ आत्महत्या करताना त्यांनी कंबरेला मोठा दगड बांधला होता़
आरोपी बालाजी रघुुनाथ कदम, अमित रघुनाथ कदम व इतरांनी व्याजाचे पैसे परत घेण्यासाठी दिलेल्या त्रासामुळे पती गणेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचे पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले़ इस्लापूर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला़ आरोपींची शिवराज पाटील सहकारी पतसंस्था नावाची संस्था असून बालाजी कदम हे त्याचे अध्यक्ष आहेत़ संस्थेचे कार्यालय ग्रामपंचायतच्या कार्यालयात सुरू आहे़ गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले़ फौजदार विठू बोणे तपास करीत आहेत़