शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आधी धिंड, नंतर हत्या; नांदेडमधील घटनेने महाराष्ट्र स्तब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 20:32 IST

अख्ख्या गावाने मध्यस्थी करून दोघांचे प्रेम प्रकरण मिटविले होते. परंतु लग्नानंतरही ते पुन्हा बहरल्याने मुलीच्या कुटूंबियांनी टोकाचे पाऊल उचलले.

नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. विवाहित तरुणी व तिच्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. यापूर्वी गावातून दोघांची ‘धिंड काढल्याचा’ व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

बोरजुनी गावातील संजीवनी सुधाकर कमळे (वय १९) हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होऊन ती गोळेगाव (ता. उमरी) येथे सासरी राहत होती. मात्र, विवाहाआधीच तीचे माहेर असलेल्या बोरजुनी येथील लखन बालाजी भंडारे (वय १७) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही लपून-छपून दोघांच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या. मुलीच्या आई-वडिलांनी याला प्रखर विरोध केला होता. अख्ख्या गावाने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न झाला. तरीही त्यांच्या भेटी सुरू राहिल्याने मुलीच्या कुटुंबियांचा राग शिगेला पोहोचला.

सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) दुपारी संजीवनी व लखन गोळेगावात सासरी भेटले. त्यावेळी मुलीच्या सासरच्यांनी दोघांना पकडले व तिच्या वडिलांना गावात बोलावून घेतले. दोघांना गावकऱ्यांसमोर हात बांधून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर गावभर फिरवत धिंड काढण्यात आली. हा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करण्यात आला आणि तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर संजीवनीचे वडील मारुती लक्ष्मण सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांनी मिळून दोघांना निर्दयपणे ठार केले. मृतदेह जवळच असलेल्या बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले.

तिघांना पोलिसांनी केली अटकसायंकाळी या घटनेची माहिती बाहेर आली आणि गावात खळबळ माजली. मयत लखनच्या वडिलांना बालाजी भंडारे या लखनच्या मित्राकडून याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने उमरी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीवरून उमरी पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. मंगळवारी (दि. २६) त्यांना भोकर न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरलामंगळवारी सकाळी दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर संजीवनीचा अंत्यसंस्कार गोळेगाव येथे, तर लखनचा अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी बोरजुनी येथे करण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी गावात हळहळ व्यक्त झाली. या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. गावाच्या मानासाठी प्रेमीयुगुलाचा जीव घेतल्याची चर्चा सर्वत्र आहे. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी गावभर काढण्यात आलेल्या धिंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, समाजमन हादरले आहे.

टॅग्स :Honor Killingऑनर किलिंगNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी