शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:44 IST

तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.

ठळक मुद्दे२५ वर्षानंतर पुन्हा प्रक्रियाकुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची माहिती

नांदेड: महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकीतून  अनेक नवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या गटातील वाढत्या भांडणतंट्यामुळे या निवडणुकाच बंद करण्यात आल्या होत्या. मात्र चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परीषद निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभागृहामध्ये कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षणतज्ज्ञ आनंद माणूसकर (मुंबई), प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंघ बिसेन, कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी यांच्यासह परमेश्वर हासबे, ज्ञानोबा मुंडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याबाबत कुलगुरु डॉ. भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण असतात. या गुणाला संधी मिळावी या हेतूने वरील नव्या अधिनियमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुका पारदर्शी मोकळ्या वातावरणात आणि भयरहीत होण्यासाठी महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. डॉ. बिसेन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावेत, याच हेतूने सदर निवडणुका घेण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांत सामाजिक जाणीवही निर्माण होईल. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नवे नेतृत्वही या माध्यमातून उदयास येईल. या अनुषंगाने विद्यार्थी परीषदेची दर तीन महिन्याला बैठक होणार असून राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामधूनही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येईल.

एक विद्यार्थी ५ पदासाठी करणार मतदान शिक्षणतज्ज्ञ माणूसकर यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. सदर अधिनियम मागच्यावर्षी लागू झाला. मात्र उशीर झाल्यामुळे मागील वर्षी विद्यार्थी परीषदेच्या निवडणुका घेता आल्या नाहीत. त्या यावर्षी घेण्यात येणार आहेत. एका विद्यार्थ्याला पाच मतदान करण्याचा अधिकार राहणार असून, त्यामध्ये एक वर्ग प्रतिनिधी, दुसरा अध्यक्ष, तिसरा सचिव, चौथा महिला प्रतिनिधी आणि पाचवा मागासवर्गीय प्रतिनिधी असणार आहे. वर्ग प्रतिनिधी सोडून इतर चार पदे महाविद्यालयांतून निवडून द्यायची आहेत. त्यानंतर विद्यापीठस्तरावर पसंती क्रमाने या चार विद्यार्थी परिषद गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच यासाठी विद्यापीठातर्फे ३१ जुलैपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेऊन विद्यापीठ विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थीElectionनिवडणूकNandedनांदेड