पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या ह.भ.प.चिकणकर महाराजाला कठोर शिक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:44+5:302021-06-09T04:22:44+5:30

ह.भ.,प.चिकणकर महाराजाने आपल्या पत्नीला अमानवीय पद्धतीने बादलीने व लाथा-बुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली आहे. ती महिला अक्षरशः प्रचंड घाबरून ...

Strictly punish HBP Chikankar Maharaj who inhumanely beat his wife | पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या ह.भ.प.चिकणकर महाराजाला कठोर शिक्षा करा

पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या ह.भ.प.चिकणकर महाराजाला कठोर शिक्षा करा

ह.भ.,प.चिकणकर महाराजाने आपल्या पत्नीला अमानवीय पद्धतीने बादलीने व लाथा-बुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली आहे. ती महिला अक्षरशः प्रचंड घाबरून मारू नका, म्हणून हात जोडत होती तरी त्या चिकणकर महाराजांने कोणतीही पर्वा न करता मारहाण सुरूच ठेवली. या नीच प्रवृत्तीचा भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून दोषी ह. भ.प.चिकनकर महाराज यांच्यावर कठोर शिक्षा करावी अन्यथा पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर कॉ.प्रा.सदाशिव भुयारे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॉ.प्रा.इरवंत रा.सुर्यकर, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष कॉ.प्रा.रहमान सय्यद,नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.अंबादास भंडारे,नांदेड जिल्हामहासचिव कॉ.प्रा.देविदास इंगळे,भारतीय स्टुडंट्स फेडरेशन चे नांदेड जिल्हा महासचिव कॉ.माधव भुयारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Strictly punish HBP Chikankar Maharaj who inhumanely beat his wife