शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

वाईबाजार येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:33 IST

तालुक्यातील मौजे मदनापूर-करळगाव येथील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्च रोजी वाईबाजार येथे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३६१ वर महिलांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील मौजे मदनापूर-करळगाव येथील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्च रोजी वाईबाजार येथे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३६१ वर महिलांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.आंदोलनात मदनापूर, करळगाव येथील शेकडो महिला, युवक व अबालवृद्धांचा समावेश होता. माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, बीडीओ यु. डी. मांदाडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मांदाडे यांनी विहीर अधिग्रहण करण्याचे आश्वासन दिले. जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव यांनीही आंदोलनाची दखल घेत मंजूर चार बोअरवेलचे काम लगेच सुरु करण्याचे आदेश दिले. तहसीलदार वरणगावकर यांनी मदनापूर येथे विहीर अधिग्रहण प्रस्तावास तात्काळ मान्यता देऊन भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये, अशी सूचना ग्रामसेवकांना केली. यावेळी वंदना आडे, इंदुबाई टनमने, वर्षा ढोले, नीता वाघाडे, सयाबाई दुधकर, इंदुबाई दालपे, विजय पेंदोर, राजू टणमने, प्रमोद कोगूरवार, स्वप्निल टनमणे, ज्ञानेश्वर दालपे, संजय अन्नमवार आदी सहभागी होते.२० फेब्रुवारी रोजी मदनापूर येथील ललित गावंडे यांचा बोअर अधिग्रहण केल्यानंतर त्या बोअरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र २६ जानेवारीपासून विजय गावंडे यांचा बोअर अधिग्रहण केला असल्याचा खोटा अहवाल सादर केला. प्रत्यक्ष मात्र त्या बोअरवरून गावाला थेंबभरसुद्धा पाणी देण्यात आले नसल्यानेच हे आंदोलन करावे लागले असल्याचे रास्ता रोको आंदोलनाच्या प्रमुख कमलबाई रामटेके यांनी सांगितले.उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके व सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शिवरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :agitationआंदोलनNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6