शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मद्यनिर्मितीसाठी होणारा पाणीउपसा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:46 IST

येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती होत असलेल्या कंपनीला पाणीपुरवठा कशासाठी ? हा प्रश बैठकीत चांगलाच गाजला.

ठळक मुद्देधर्माबादेत आराखडा बैठक पाणीटंचाईचे संकट उभे असताना मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला पाणीपुरवठा

धर्माबाद : येथे झालेल्या पाणीटंचाई आराखडा निवारण बैठकीत बोअर अधिग्रहण, नवीन बोअर या मागणीबरोबर शेळगाव (ध) येथील मत्स्यव्यवसायासाठी व मद्यनिर्मिती करणा-या कंपनीला दररोज होत असलेल्या लाखो लिटर पाणी पुरवठ्यास विरोध करण्यात आला़ पाणीटंचाईच्या काळात दारूची निर्मिती होत असलेल्या कंपनीला पाणीपुरवठा कशासाठी ? हा प्रश बैठकीत चांगलाच गाजला.आ.वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई निवारण बैठक ६ डिसेंबर रोजी नगरपालिका सभागृहात पार पडली़ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीत तालुक्यातील सर्व गावांतील पाणीटंचाईच्या समस्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिनिधींनी मांडल्या़पावसाचे प्रमाण तीन, चार वर्षांपासून कमी झाल्याने गोदावरी पात्रात कमी साठा होत आहे. भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे असताना व्यावसायिकांना गोदावरी नदीपात्रातून पाणी का दिले जाते ? जनावरांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना हे प्रशासनास दिसत नाही काय? पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी की दारूसाठी ? असा प्रश्न मनूर येथील सरपंच एकनाथ जिंकले यांनी उपस्थित केला़ शिवराज गाडीवान यांनी मत्स्यव्यवसायाला होणारा पाणीपुरवठा थांबवावा, अशी मागणी केली़धर्माबाद तालुक्यात पाटबंधारे विभाग उमरीअंतर्गत होत असलेले स्वजल, पेयजल पाणीपुरवठ्याचे कामे दहा- दहा वर्षांपासून अर्धवट आहेत़ तर काही बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपये खर्च करून योजना कुचकामी ठरली आहे ; पण उमरी येथील पाटबंधारे विभाग काहीच लक्ष देत नाही. दरवर्षी प्रत्येक पाणीटंचाई आराखडा बैठकीत अनेक तक्रारी केल्या जातात़ त्यावरसुद्धा बैठकीत गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असा आरोप सरपंचांनी बैठकीत केला़बन्नाळीचे सरपंच साईनाथ पाटील यांनी पेयजल योजनेची टाकी पाडण्याची विनंती केली़ पाणी पुरवठ्याचे शेख युसूफभाई हे निष्क्रिय अधिकारी असून प्रत्येक बैठकीत उडवाउडवीची उत्तरे देतात. ते कोणतेच कामे करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़ पंचायत समितीचे सदस्य सदस्य मारोती कागेरू यांनी शेख युसूफभाई यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला़ युसूफभाई यांची तालुक्यातून बदली केली तरच पाणीपुरवठ्याची कामे योग्य होतील, असा संताप सदस्यांनी व्यक्त केला. बहुतांश सरपंचांनी पाणी पुरवठा व वीजवितरणबद्दल तक्रारी केल्या़ गेल्यावर्षीच्या पाणीटंचाई आराखडा बैठकीतील समस्या सोडविल्या जात नाही़ पाणीटंचाई आराखडा बैठक केवळ नावालाच असल्याचे अनेक सरपंचांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीस आ. वसंतराव चव्हाण यांच्यासह तहसीलदार ज्योती चौहाण गटविकास आधिकारी मोहन जाधव, नगर परिषद धर्माबादचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, अब्दुल सत्तार शेठ, जिल्हा परीषदचे कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, पंचायत समीतीचे सभापती रत्नमाला जयराम पाटील, उपसभापती चंद्रकांत वाघमारे, मारोती कागेरू, नागोराव पाटील रोशनगावकर, दत्ताहारी पाटील चोळाखेकर, प्रा़ रवींद्र मुपडे, संजय मिरजकर आदींसह सर्व गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्तया भागात वारंवार डीपी जळत असून वीज वितरण विभागाकडून वेळेवर डीपी दिल्या जात नाही़ त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांची पिके करपून जात आहेत़ दिवस, रात्र विजेचा लपंडाव सुरू राहत असून अनेक गावे अंधारात राहत आहेत़ वीज नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ वीज वितरणचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत़ डीपीची मागणी केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत नाहीत. धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत वीज नसल्याने डिजिटल धडे देणे बंद आहे. त्यामुळे डिजिटल शाळा कशासाठी ? असा प्रश्न बाचेगावचे उत्तमराव पाटील बाचेगावकर यांनी उपस्थित केला. सभापती दत्तात्रय रेड्डी यांनी यावेळी आपले विचार मांडले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई