गवळी समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:24+5:302021-05-30T04:16:24+5:30
यादव अहीर गवळी समाजाचे कार्यकर्ते शिवराज नारीयलवाले यांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक सुधीर किरडकर, पोलीस निरीक्षक ...

गवळी समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
यादव अहीर गवळी समाजाचे कार्यकर्ते शिवराज नारीयलवाले यांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक सुधीर किरडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह १० ते १२ पोलिसांनी अमानुष मारहाण केली. व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला. समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी करीत घटनेचा निषेध व्यक्त केला. यादव महासभेचे राष्ट्रीय महासचिव बिशनकुमार यादव यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या वेळी नांदेड जिल्हा गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन गुरखुदे, महानगर अध्यक्ष धीरज यादव, माजी नगरसेवक किशोर यादव, ॲड. इंद्रजित यादव, डॉ. संतोष यादव, डॉ. कैलाश यादव, राहुल औसेकर व बागड्या यादव, माजी नगरसेवक तुलजेश यादव, बिल्लू यादव, बिरबल यादव, भारत यादव, गगन यादव, बबलू यादव, पवन मंडले, कुंवरचंद मंडले, तुलजाराम यादव, दिनेश रौतरे, बालाप्रसाद रौतरे, शिराज चक्रवार यांची उपस्थिती होती.